ईशाच्या पार्टीत अंबानींच्या सुनांचा ग्लॅमरस लूक! वेधून घेतलं सर्वांचं लक्ष…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मुकेश अंबानींची लेक ईशा आणि जावई आनंद पिरामलने त्यांच्या राहत्या घरी ग्रॅंड पार्टीचं आयोजन केलं होतं.

हे वाचलं का?

ईशा अंबानी आणि आनंद पिरामलने त्यांच्या दोन जुळ्या मुलांसाठी ही वेलकम पार्टी ठेवली होती.

ADVERTISEMENT

यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब पार्टीसाठी हजर होतं. या खास प्रसंगी नीता अंबानीसोबत श्लोका मेहता आणि होणारी सून राधिका मर्चंट खूप सुंदर दिसत होत्या.

ADVERTISEMENT

नीता अंबानी यांनी प्रिंटेड निळ्या रंगाची पटोला साडी नेसली होती.

नीता अंबानी यांनी साडीवर साजेसा हलका मेकअप, टिकली आणि केसांचा बन घातला होता. यासोबत नेकलेस, मॅचिंग कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या.

तर, श्लोका मेहताने पिवळा सिल्क पेप्लम टॉप आणि पारंपारिक गुजराती स्कर्ट परिधान केला होता.

श्लोकाने कपड्यांवर मॅचिंग डायमंड नेकलेस, मॅचिंग कानातले आणि ब्रेसलेट परिधान केले होते.

त्याचवेळी अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून राधिका मर्चंटने सुंदर निळ्या-गोल्डन रंगाचा बनारसी लेहेंगा परिधान केला होता.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT