गोपीचंद पडळकर की रोहित पवार; MPSC परीक्षार्थ्यांना कोणामुळे दिलासा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pune MPSC students agitation मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी UPSC च्या धर्तीवर MPSC चा नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोगालाही याबाबत विनंती केली आहे. यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला असून सरकारचे आभार मानले आहेत. तसंच आता आंदोलनही मागे घेण्यात आलं आहे. (Chief Minister Eknath Shinde has approved the demand to implement the new syllabus of MPSC on the lines of UPSC from 2025 instead of this year)

ADVERTISEMENT

दरम्यान, परीक्षार्थ्यांना मिळालेल्या दिलासानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मागणीनंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याचा दावा केला आहे. या दोन्ही आमदारांनी आंदोनस्थळी भेटही दिली होती.

आज आंदोलनस्थळी भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी परीक्षर्थ्यांनी दोन्ही आमदारांनी डोक्यावर घेऊन पुण्यात मिरवणूक काढली. गोपीचंद पडळकर बोलताना म्हणाले, आम्ही घरात बसणारे लोकप्रतिनिधी नाही. विरोधात असलो किंवा सरकारमध्ये असलो, तरी लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आमची पोस्टमनची भूमिका असते. आम्ही ती भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांचं म्हणणं सरकारपुढे मांडलं.

हे वाचलं का?

दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन त्यांच्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. निर्णय झाल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट म्हणाले, नव्या परीक्षा पद्धतीला परीक्षार्थींचा विरोध नव्हताच, त्यांना केवळ वेळ हवा आहे. हाच विषय मांडल्यानंतर सहकार्याची भूमिका घेत नवी परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार आणि परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा!

ADVERTISEMENT

तसंच यावेळी पवार यांनी पडळकर यांच्यावर टीका करत उगाच कोणी श्रेय घेऊ नये म्हणतं टोला हाणला. ते म्हणाले, युवा जेव्हा आंदोलन करतो तेव्हा त्यामागं कारण असतं, राजकारण नसतं. याचा विचार करून निर्णय आधीच घेतला पाहिजे होता. पण काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उगाचच कोणी राजकीय श्रेय घेऊ नये. यामागे मुलांचेही कष्ट आहेत.

ADVERTISEMENT

त्यामुळे आता या निर्णयाचं आता नेमकं श्रेय कोणाचं हा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत बोलताना परीक्षार्थी म्हणाले, निर्णय कोणाकडूनही येवो आमच्यासाठी चांगलचं आहे. विद्यमान सरकार भाजपच आहे, त्यांच्याकडून आलं तर चांगलचं आहे. तर थोडफार राजकारण होणारचं, निर्णय होणं महत्वाचं आहे, असाही विद्यार्थ्यांचा सूर पाहयला मिळाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT