गुजरात : मुंद्रा पोर्टवर सापडला अमेरिकन गांजा; कारमधील कंटेनरमध्ये लपवली होती पाकिटं
गुजरातच्या कच्छमध्ये असलेलं मुंद्रा पोर्ट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अदानी समूहाच्या मालकीच्या असलेल्या या बंदरावर मोठ्या प्रमाणात अमेरिकन गांजाचा साठा सापडला आहे. एनसीबीने कारवाई करत हा साठा जप्त केला असून, कंटेनरमध्ये असलेल्या कारमध्ये हा गांजा लपवण्यात आलेला होता. अंमली पदार्थविरोधी विभाग अर्थात एनसीबीच्या एका पथकाने कंटेनरमध्ये लपवून आणण्यात आलेला अमेरिकन गांजाचा साठा जप्त केला. […]
ADVERTISEMENT
गुजरातच्या कच्छमध्ये असलेलं मुंद्रा पोर्ट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अदानी समूहाच्या मालकीच्या असलेल्या या बंदरावर मोठ्या प्रमाणात अमेरिकन गांजाचा साठा सापडला आहे. एनसीबीने कारवाई करत हा साठा जप्त केला असून, कंटेनरमध्ये असलेल्या कारमध्ये हा गांजा लपवण्यात आलेला होता.
ADVERTISEMENT
अंमली पदार्थविरोधी विभाग अर्थात एनसीबीच्या एका पथकाने कंटेनरमध्ये लपवून आणण्यात आलेला अमेरिकन गांजाचा साठा जप्त केला. कारच्या डिक्कीत गांजाची पाकिटं लपवण्यात आली होती.
Gujarat ATS : गुजरातमध्ये पुन्हा 600 कोटींचे हेरॉईन जप्त; पाकिस्तानातून आला साठा
हे वाचलं का?
एनसीबीच्या एका पथकाने बुधवारी मुंद्रा पोर्टवर आलेल्या एका कंटेनरची झाडाझडती घेतली. यावेळी कंटेनरमध्ये असलेल्या कारच्या डिक्कीमध्ये अंमली पदार्थाची ९० पाकिटं अधिकाऱ्यांना सापडली. हा साठा जप्त करण्यात आला असून, तपासणीमध्ये या पाकिटांमध्ये अमेरिकन गांजा असल्याचं समोर आलं.
एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. यात मुंद्रा पोर्टवर आलेला हा कंटेनर हरयाणातील सोनीपत येथे नेण्यात येणार होता. म्हणजे हा अमेरिकन गांजा सोनीपतमध्ये पोहोचवला जाणार होता. माहितीनुसार मोठंमोठ्या पार्ट्यांमध्ये अमेरिकन गांजा मागवला जातो.
ADVERTISEMENT
सुशांत प्रकरणानंतर मुंबईला म्हटलं गेलं ड्रग्ज कॅपिटल, बघा 3000 किलो ड्रग्स जाणार होतं कुठे?
ADVERTISEMENT
मुंद्रा पोर्ट पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा साठा आढळून आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी कच्छकडे येणाऱ्या समुद्री मार्गांवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. डीआरआय, कस्टम आणि एटीएसनंतर आता एनसीबीने मुंद्रा पोर्टवर मोठी कारवाई केली आहे.
अंमली पदार्थ आढळून आल्याच्या घटना मुंद्रा पोर्टवर यापूर्वीही घडल्या आहेत. १६ डिसेंबर २०२१ रोजी मुंद्रा पोर्टवर अफगाणी हेरॉईनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या हेरॉईनची किंमत ९,००० कोटीपेक्षा अधिक होती. दोन कंटेनरमधून हे हेरॉईन मुंद्रा पोर्टवरील डीपी वर्ल्ड टर्मिनलवर आणण्यात आलं होतं.
या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. अदानी समूहानेही स्पष्टीकरण दिलं होतं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT