Navneet Rana Vs Shiv sena : नवनीत राणा आणि शिवसेनेत संघर्षाची ठिणगी कधी पडली?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. दरम्यान, तेढ निर्माण केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली. हनुमान चालीसा पठणाच्या निमित्ताने राणा विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष दिसत असला, तरी याची पहिली ठिणगी पडली ती २०१४ मध्ये. मार्च २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. दरम्यान, तेढ निर्माण केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली.
हनुमान चालीसा पठणाच्या निमित्ताने राणा विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष दिसत असला, तरी याची पहिली ठिणगी पडली ती २०१४ मध्ये.
हे वाचलं का?
मार्च २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली.
ऑगस्ट २०१८ मध्ये नवनीत राणा यांनी आनंदराव आडसुळ यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.
ADVERTISEMENT
जुलै २०१८ मद्ये रवि राणांविरोधात आनंदराव आडसूळ यांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
ऑगस्ट २०१८ मध्येच रवि राणा यांनी दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.
मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला.
जुलै २०१९ मध्ये शिवसेनेकडून नवनीत राणा यांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं.
त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये राणा दाम्पत्याने शेतकऱ्यांना सोबत घेऊन मातोश्रीवर धडक देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मार्च २०२१ मध्ये नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यावेळी त्यांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला होता.
जून २०२१ मध्ये आनंदराव आडसुळांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र ८ जून २०२१ रोजी रद्द केलं.
त्यानंतर जून २०२१ मध्येच नवनीत राणांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.
जानेवारी २०२२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात रवि राणा यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं.
फेब्रुवारी २०२२ मध्ये आमदार रवि राणा यांच्यावर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
एप्रिल २०२२ मध्ये नवनीत राणा आणि रवि राणा मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान देत मुंबईत आले. पोलिसांनी अटक केली असून, त्यांना ६ मे रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT