कोविड परत येतोय? आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राज्याला महत्वाच्या सुचना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर : चीन, अमेरिकेसह इतर पाश्चात्य देशात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील रुग्ण संख्या अलर्टवर झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. या पाठोपाठ राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर विधानसभेत निवदेन सादर केलं. यानंतर त्यांनी राज्याला काही महत्वाचे निर्देशही दिले.

काय म्हणाले आरोग्य मंत्री तानाजी सावंत?

मागील काही आठवड्यांचे अवलोकन केले असता राज्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मागील आठवड्यामध्ये राज्यात कोविड रुग्णसंख्या त्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. कोविड चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे शेकडा प्रमाण ०.२९ एवढा कमी आहे. संसर्ग होऊन रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत चालले असून मागील आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यात १६ रुग्ण भरती झालेले आहेत. दिनांक २२ डिसेंबर रोजीच्या अहवालानुसार राज्यात एकूण १३४ क्रियाशील रुग्ण आहेत.

राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. विशेषत: चीनमध्ये रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याचे माध्यमातील बातम्यांवरून दिसत आहे. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ. ७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रम व्यवस्थेची माहिती आणि आढावा घेण्यात आला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोविडची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले-

१) भीती नको पण काळजी घ्या. – चीनमधील बीएफ. ७ हा व्हेरियंट पूर्वी भारतात आढळलेला आहे. त्यामुळे या व्हेरियंटमुळे भिती बाळगण्याची गरज नसली तरी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. कोविड अनुरुप काळजी आणि लसीकरण यावर भर द्यावा.

ADVERTISEMENT

२) मास्क सक्ती नाही पण वरिष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असणा-या व्यक्तींनी गर्दीच्या/ सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितावह राहील.

ADVERTISEMENT

३) पंचसूत्रीचा वापर – सर्व जिल्ह्यांनी टेस्ट- ट्रॅक – ट्रीट – वॅक्सिनेट आणि कोविड अनुरुप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा.

४) प्रयोगशाळा चाचण्या वाढविणे आणि आर टी पी सी आर चाचणीवर भर – प्रत्येक जिल्हा / मनपाने आपले टेस्टींग वाढवावे. प्रयोगशाळा चाचण्यांमधील आरटी पीसीआरचे प्रमाण वाढवावे.

५) १०० % जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी – प्रत्येक आर टी पी सी आर बाधीत नमुना (सी व्हॅल्यू ३० पेक्षा कमी) जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोमिक सिक्वेंसिंग) पाठविण्यात येईल. यामुळे नव्या व्हेरियंटकडे लक्ष देणे सहज शक्य होईल.

६) कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि प्रिकॉशन डोस वर भर – प्रत्येक जिल्ह्यातील कोविड लसीकरण अधिक वेगाने होणे आवश्यक आहे आणि विशेषतः प्रिकॉशन डोसकडे अधिक लक्ष देण्याचे आदेश सर्वांना देण्यात आले.

७) रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी – प्रत्येक रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील जीवनरक्षक प्रणाली, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन प्लांट हे सुरळीतरित्या सुरु आहेत ना, या बद्दल खातरजमा करण्यात यावी. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांना यासंदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

८) मनुष्यबळ प्रशिक्षण आणि क्षमता संवर्धन- कोविड प्रतिबंध आणि नियंत्रण संदर्भात सर्व स्तरावर कार्यरत मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्याबाबत सर्वांना निर्देशित करण्यात येत आहे.

९) आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग – या संदर्भात भारत सरकारसोबत समन्वय ठेवून योग्य निर्णय घेण्यात येईल तसेच पूर्वीप्रमाणे या प्रवाशांपैकी रॅडम २ टक्के प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने घेण्याबाबतही भारत सरकारसोबत चर्चा करुन ठरविण्यात येईल.

१०) राज्य टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन या परिस्थितीबाबत तज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात येईल तसेच प्रत्येक जिल्ह्यानेही आपल्या जिल्हा कोविड संनियंत्रण समितीची आढावा बैठक घेऊन आपल्या स्तरावरील कोविड नियंत्रण तयारी पूर्ण करावी, याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT