आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी ‘या’ कारणामुळं ससून रुग्णालयात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं
सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते पुण्यातील ससून रुग्णायातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडसावत असल्याचं दिसत आहे. तानाजी सावंत यांनी स्वतःच आपल्या फेसबुक अकाउंटवर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते ग्रामीण भागातील तरुणाला दोन दिवसापासून उपचारासाठी का उपलब्ध होत नसल्याचा जाब विचारत आहेत. तानाजी सावंत यात ससून प्रशासनावर […]
ADVERTISEMENT
सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते पुण्यातील ससून रुग्णायातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडसावत असल्याचं दिसत आहे. तानाजी सावंत यांनी स्वतःच आपल्या फेसबुक अकाउंटवर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते ग्रामीण भागातील तरुणाला दोन दिवसापासून उपचारासाठी का उपलब्ध होत नसल्याचा जाब विचारत आहेत. तानाजी सावंत यात ससून प्रशासनावर संतापलेले दिसत आहेत आणि रुग्णलयाचे अधिकारी यांना धारेवर धरत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
तानाजी सावंत इतके का चिडले
सोलापूर जिल्ह्यातील ताक मोहोळ येथील एक तरुण गेल्या अनेक वर्षांपासून एका रोगामुळे त्रस्त आहे. त्यासाठीचे उपचार घेण्यासाठी तो ससून रुग्णालयात गेला असता त्याला काही दिवस त्या रोगाशी संबंधित डॉक्टर नाहीत म्हणून दाखल करून घेतलं नाही. शेवटी या तरुणाने आणि त्याच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे धाव घेऊन आपली कैफियत सांगितली. तानाजी सावंत यांनी देखील तरुणाला घेऊन ससून रुग्णालय गाठले. नाराज तानाजी सावंत यांनी तरुणाला उपचारासाठी प्रतिसाद का दिला गेला नाही, असा जाब विचारला. एकूणचं रुग्णालयातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. तसंच अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करत त्या तरुणाला दाखल करायला लावलं.
काय म्हणालेत तानाजी सावंत?
तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुकवरून पोस्ट करून माहिती दिली की, आज माझ्याकडे ग्रामीण भागातून पुण्यात उपचारासाठी आलेले तरुण येऊन भेटले. ससून रुग्णालय पुणे येथील प्रशासन त्यांना 2 दिवसांपासून उपचारासाठी उपलब्ध होत नाही अशी माहिती मिळाली. या तरुणाला उपचाराची गरज असताना 2 ते 3 दिवसांपासून रुग्णालयात येऊन देखील आरोग्य यंत्रणा उपलब्ध होत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. ही एक प्रातिनिधिक स्वरूपातील घटना समोर आली.
हे वाचलं का?
म्हणून आज स्वतः ससून रुग्णालयात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना रूग्णालयात कोणत्याही रूग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. तसेच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून दर्जेदार आरोग्य सेवा वेळेवर पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी दिल्या.जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय मदत अतिशय तत्पर असणे आवश्यक असते याचं भान सर्वांनी राखणं गरजेज आहे.
सतत चर्चेत असणारे तानाजी सावंत
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे नेहमी वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. नुकतंच त्यांचा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर असा प्रसिद्ध दौरा चांगलाच चर्चेत आला होता. कोण आदित्य ठाकरे असाही त्यांनी उल्लेख केल्यानंतर नेटकऱ्यांच्या ते रडावर होते तर आता पावसाळी अधिवेशन दरम्यान विरोधकांनी आरोग्य विभागाच्या कारभाराचे दर्शन घडवून आणल्यानंतर उत्तर देताना त्यांची झालेली पंचाईत चर्चेत राहिलेली आहे. त्यानंतर आता ऍक्शन मोडवर पाहायला मिळाले. त्यांचा ससून रुग्णालयातील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT