उस्मानाबादमध्ये उष्माघाताचा बळी! उन्हात काम करून शेतकऱ्याने पाण्याचा घोट घेताच मृत्यू
उस्मानाबादमध्ये उष्माघातामुळे एका शेतकऱ्याला त्याचा प्राण गमवावा लागला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमानाचा पारा ४० च्याही पुढे गेला आहे. भर दुपारी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला उन्हाचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील हासेगाव केज या ठिकाणी हा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. उन बरंच लागल्याने त्याने पाण्याचा घोट घेतला […]
ADVERTISEMENT

उस्मानाबादमध्ये उष्माघातामुळे एका शेतकऱ्याला त्याचा प्राण गमवावा लागला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमानाचा पारा ४० च्याही पुढे गेला आहे. भर दुपारी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला उन्हाचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील हासेगाव केज या ठिकाणी हा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. उन बरंच लागल्याने त्याने पाण्याचा घोट घेतला आणि त्यानंतर लगेचच त्याला चक्कर आली.
लिंबराज सुकाळे वय वर्ष 50 या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी प्यायल्यानंतर या शेतकऱ्याला उष्माघाताचा झटका बसला. उपचारासाठी कळंब मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केलं. गेल्या 6 दिवसापासून उन्हाचा पारा गेला आहे चाळीशीच्या पार आहे. उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
वास्तूशांती समारंभासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
नेमकी काय घडली घटना?









