सर्व नियमांचं पालन करतो, वेळ वाढवून द्या ! Hotel and Restaurants असोसिएशनची राज्य सरकारकडे मागणी
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने आता हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ करुन द्यावी अशी मागणी हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेने केली आहे. यासंदर्भातलं एक पत्र संघटनेने राज्य सरकारला लिहीलं असून ज्यात सर्व सरकारी नियमांचं पालन केलं जाईल, परंतू सरकारने हॉटेल सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची […]
ADVERTISEMENT
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने आता हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ करुन द्यावी अशी मागणी हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेने केली आहे. यासंदर्भातलं एक पत्र संघटनेने राज्य सरकारला लिहीलं असून ज्यात सर्व सरकारी नियमांचं पालन केलं जाईल, परंतू सरकारने हॉटेल सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे त्या ठिकाणी वेळांमध्ये बदल करुन देण्याची मागणी संघटनेने केली आहे. सध्या सरकारी नियमाप्रमाणे हॉटेल ही ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवावी लागत आहेत. परंतू या नियमांमुळे हॉटेल मालकांना मोठं आर्थिक नुकसान होत असून अनेक हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती The Hotel and Restaurant Association of Western India संघटनेचे अध्यक्ष सेहेरी भाटीया यांनी दिली आहे.
गेल्या १५ महिन्यांपासून या न त्या कारणामुळे राज्यातले हॉटेल व्यवसायिक हे नुकसान सोसत आहेत. राज्यातील ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमची बंद झाली आहेत. आजही अनेक हॉटेल मालकांमध्ये, हॉटेल कधी सुरु करायचं, कधी बंद करायचं, किती दिवस सुरु ठेवायचं, किती स्टाफ ठेवायचा याबद्दल संभ्रम आहे. अशा परिस्थितीत हॉटेल सुरु करणं आणि कामगारांना परत बोलावणं हे मालकांसाठी खूप जिकरीचं होऊन बसलं आहे. त्यामुळे या व्यवसायाला आता स्थैर्य मिळणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रीया भाटीया यांनी दिली.
हे वाचलं का?
कोरोना महामारीच्या आधी दुपारच्या जेवणापर्यंत हॉटेलमालक १५ ते २० टक्के कमाई करायचे. शनिवार-रविवारी ही कमाई जवळपास ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत जायची. परंतू आता बहुतांश ऑफीसमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे धंदा हा जवळपास संपत आला आहे अशी माहिती भाटीया यांनी दिली. त्यामुळे सरकार आता याबद्दल नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT