मोदी-शाह यांना खुलं आव्हान देणारे हार्दिक पटेल भाजपचे सैनिक कसे झाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाटीदार आंदोलनाचा झेंडा उभारत नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांच्याविरोधात बंड पुकारणारे हार्दिक पटेल हे भाजपचे सैनिक झालेत. हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटरवरून नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांच्या विरोधातले ट्विटही डिलिट केलेत. पाटीदार आंदोलनापासून सुरूवात करत आधी काँग्रेसमधे जाणारे हार्दिक पटेल आता भाजपचे सैनिक झालेत. त्यांचा हा प्रवास कसा झाला आहे हे जाणून घेऊ सविस्तर-

ADVERTISEMENT

गुजरात राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्या निवडणुकीच्या आधीच हार्दिक पटेल यांनी भाजपत प्रवेश केलाय. २०१५ ला गुजरातमधे जे पाटीदार समाजाचं आंदोलन उभं करण्यात हार्दिक पटेल यांचा सिंहाचा वाटा होता. सरकारी नोकरी तसंच शिक्षणात पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी करत हे आंदोलन पेटलं होतं. हार्दिक पटेल हे या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. एका आंदोलनातील हिंसाचारादरम्यान पोलिसासह १० जणांचा मृत्यू झाला होता. तसंच सार्वजनिक मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं होतं.

हे वाचलं का?

यानंतर हार्दिक पटेल विरोधात आयपीसी १२४ ए, १२१ ए तसंच १२० बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २०१६ मध्ये हार्दिक पटेल यांना जामीन मिळाला. राज्यातील भाजपच्या सरकारने आता २०१५ मधले आरक्षण आंदोलनाच्या बाबत दाखल झालेले हार्दिक पटेल यांच्या तसंच इतरांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यायला सुरूवात केली आहे.

कुर्मी, पाटीदार तसंच गुर्जर या समुदायांचा समावेश ओबीसींमध्ये करावा आणि त्यांना सरकारी नोकरी दिली जावी या मागणीसाठी हार्दिक पटेली यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पटेल नवनिर्माण सेनाही स्थापन केली होती. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात हार्दिक पटेल यांच्या विरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा आरोपही लावला गेला होता.

ADVERTISEMENT

२०१७ मध्ये गुजरातमध्ये ज्या निवडणुका पार पडल्या त्या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल काय करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पटेल कांग्रेस सोबत गेले. त्यांच्यासोबतच अल्पेश ठाकोर तसंच जिग्नेश मेवाणी यांच्या मदतीने कांग्रेस पूर्ण तयारीने मैदानात उतरला होता. या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१९ ला राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल यांनी कांग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ADVERTISEMENT

मेहसाणा दंगल प्रकरणी जुलै 2018 मध्ये सत्र न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरवले होते. यानंतर हार्दिकने गुजरात हायकोर्टात जाऊन शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने ते निवडणूक लढवू शकला नाही. त्यानंतर हार्दिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथूनही दिलासा मिळाला नाही.

हार्दिक पटेल यांचे जवळचे सहकारी चिराग पटेल आणि केतन पटेल यांनी त्यांच्यावर पाटीदार समाजाच्या निधीचा गैरवापर “आलिशान” जीवन जगण्यासाठी केल्याचा आरोप केला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये पटेल यांची एक सेक्स टेप सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आणि ती व्हायरल झाली. पटेल म्हणाले की मी घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरलोय.

2019 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी नेपाळमधील लोकांविरुद्ध टिप्पण्या केल्या ज्यांचे वर्णन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना वर्णद्वेषी म्हणून केले गेले. 11 जुलै 2020 रोजी त्यांची गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. एवढंच नाही तर हार्दिक पटेल यांनी अमित शाह यांची तुलना जनरल डायरसोबतही केली होती. मात्र आता हेच हार्दिक पटेल मागचे सगळे ट्विट डिलिट करत भाजपवासी झाले आहेत. भाजपची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. आधी पाटीदार समाजाचं आंदोलन, त्यानंतर कांग्रेस पक्षात प्रवेश आणि आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांना ही नवी इनिंग फायद्याची ठरणार का हे काळच ठरवू शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT