‘बिग बॉस चाहते है’, कोण आहे या आवाजा मागे? एका सिझनसाठी किती फीस घेतात स्वतः बिग बॉस?
‘बिग बॉस चाहते हैं…’ या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये एक आवाज ऐकायला मिळतो, जो खऱ्या आयुष्यात ऐकण्याची प्रत्येकाला इच्छा असते. या आवाजामागे अतुल कपूर आहे. हा एकमेव आवाज आहे, जो ऐकल्यानंतर स्पर्धक पूर्ण उत्साहाने आणि उत्कटतेने घरातील त्यांची कामे आणि टास्क करतात. हा आवाज त्यांना खडसावतो आणि हा आवाज शोमध्ये त्यांचे स्वागतही करतो.पण तुम्हाला माहीत आहे […]
ADVERTISEMENT

‘बिग बॉस चाहते हैं…’ या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये एक आवाज ऐकायला मिळतो, जो खऱ्या आयुष्यात ऐकण्याची प्रत्येकाला इच्छा असते. या आवाजामागे अतुल कपूर आहे. हा एकमेव आवाज आहे, जो ऐकल्यानंतर स्पर्धक पूर्ण उत्साहाने आणि उत्कटतेने घरातील त्यांची कामे आणि टास्क करतात. हा आवाज त्यांना खडसावतो आणि हा आवाज शोमध्ये त्यांचे स्वागतही करतो.पण तुम्हाला माहीत आहे का की, अतुल कपूर शोमध्ये फक्त आवाज देण्यासाठी किती फी आकारतात?
अतुल एका सिझनसाठी इतके पैसे आकारतात
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अतुल कपूर प्रत्येक सीझनसाठी 50 लाख रुपये घेतात. अतुल कपूरसाठी ही रक्कम खू. चांगली आहे, कारण कॅमेरात त्यांचा चेहरा दिसत नाही, पण आवाज मात्र ऐकू येतो. 2006 सालापासून अतुल कपूर ‘बिग बॉस’ बनून यात आपला आवाज देत आहेत. ते एकटेच आहेत जे घरातील सदस्यांची झोप उडवतात. ते आपल्या आवाजाने लोकप्रिय सेलिब्रिटींवर राज्य करताना दिसतात. ते शोमध्ये दिसत नाही, पण त्यांचा आवाज नक्कीच ऐकायला मिळतो.
हॉलिवूड चित्रपटातील कलाकारांनाही दिले आवाज