फिनोलेक्सच्या संस्थापकांच्या आयुष्यावर ‘प्रल्हाद’ हा पुरस्कार विजेता सिनेमा युट्यूबवर रिलिज
‘प्रल्हाद‘ हा लघुपट म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास. ज्याने केवळ 10 रुपयांच्या सहाय्याने पहिले पाऊल टाकले आणि 10,000 कोटी रुपयांच्या कंपनीची निर्मिती केली. आपला दयाळू स्वभाव, उच्च विचार आणि संकल्प सिद्धीतून त्यांनी हे साध्य केले. काही गोष्टी पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी एकदाच नाही तर पुन्हा-पुन्हा सांगणे आवश्यक आहे.प्रल्हाद, ही फिनोलेक्सच्या संस्थापकांच्या जीवनातील निर्णायक […]
ADVERTISEMENT

‘प्रल्हाद‘ हा लघुपट म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास. ज्याने केवळ 10 रुपयांच्या सहाय्याने पहिले पाऊल टाकले आणि 10,000 कोटी रुपयांच्या कंपनीची निर्मिती केली. आपला दयाळू स्वभाव, उच्च विचार आणि संकल्प सिद्धीतून त्यांनी हे साध्य केले.
काही गोष्टी पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी एकदाच नाही तर पुन्हा-पुन्हा सांगणे आवश्यक आहे.प्रल्हाद, ही फिनोलेक्सच्या संस्थापकांच्या जीवनातील निर्णायक क्षण सांगणारी अशीच एक कथा आहे. उद्योगाच्या खडतर प्रवासात त्यांच्यासाठी ही कथा म्हणजे दीपस्तंभ आहे. दयाळू स्वभाव, उच्च आदर्श मूल्यांची जपणूक करुन निर्णय घेतल्यावर तो किती प्रभावी असतो, याचा प्रत्यय यातून येतो. हा लघुपट फिनोलेक्सच्या पायाभूत मूल्यांची मांडणी करतो आणि सुरुवातीच्या काळातील प्रत्येक भारतीय उद्योजकाच्या यशाची महती सांगतो. यात काही आश्चर्य वाटायला नको की, या कथेने याआधीच आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट महोत्सवात 22 पुरस्कार जिंकले आहेत.
1945 मध्ये घडलेली, ही कथा आहे एका 14 वर्षाच्या मुलाची, जो त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अमृतसरमधील नोकरी सोडून फक्त रु. 10 त्याच्या शर्टच्या खिशात असताना, कमावण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतो. मुंबईला जाणारया ट्रेनमध्ये, तो प्रवाशांनी खचाखच भरलेल्या डब्यात बसतो; ज्यामध्ये भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे अनेकजण असतात. त्यातील प्रत्येकजण आशेने भरलेली बॅग घेऊन या प्रवासाला निघालेला असतो. काही जण, प्रल्हाद सारखे, काम करतात आणि पैसे कमवतात आणि घरी पाठवतात. काही जण त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी प्रवास करतात. आणि काही असेच प्रवास करत आहेत कारण त्यांच्याकडे इतर कुठेही जाण्याचा मार्ग नाही.
ट्रेन मुंबईच्या दिशेने धावत असते, धुरांच्या रेषांतून वाटेत लागणाऱ्या छोट्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये थांबत असताना, तरुण प्रल्हाद त्याच्या सहप्रवाशांशी संवाद साधतो. आपल्या स्मितहास्याने तसेच लाघवी बोलण्यातून तो ट्रेनमधील सर्वांनाच आकर्षित करतो. हेच विचार आणि सहजता त्याच्या पाठीशी उभी राहते, त्याचवेळी तो जेव्हा शर्टचा खिसा तब्बल पंधराव्यांदा तपासतो, तेव्हा त्याला कळते की त्याची 10 रुपयाची नोट गहाळ झाली आहे.