Jalgaon: प्रेमी युगुलाची शाळेच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या
मनीष जोग, जळगाव जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे येथे एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ३१ जुलै) मध्यरात्रीनंतर घडली असून, ती आज (रविवारी) सकाळी उजेडात आली. मुकेश कैलास सोनवणे (वय 22) आणि नेहा बापू ठाकरे (वय 19) अशी मृतांची नावे असून दोघेही वाडे गावातील […]
ADVERTISEMENT

मनीष जोग, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे येथे एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ३१ जुलै) मध्यरात्रीनंतर घडली असून, ती आज (रविवारी) सकाळी उजेडात आली.
मुकेश कैलास सोनवणे (वय 22) आणि नेहा बापू ठाकरे (वय 19) अशी मृतांची नावे असून दोघेही वाडे गावातील रहिवासी होते.
वाडे गावातील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीतील वरच्या मजल्यावर जिन्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मुकेश व नेहा या प्रेमी युगुलाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.









