रत्नागिरीत इंटरनॅशनल कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश, मास्टर माईंडसह दोघांना अटक
हायस्पीड इंटरनेटद्वारे ‘सिप ट्रंक सिस्टिम’ मार्फत देशासह परदेशात संपर्कासाठी कॉलिंग सेंटर चालविणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल दुकानाच्या मालकाला दहशदवाद विरोधी पथकने अटक केली आहे. कमी पैशात कॉलिंग करुन देशाचे आर्थिक नुकसान करण्यात येते होते. तर या सिस्टिमचा आधार घेवून परदेशात दहशदवाद कारवायांसाठी याचा वापर होत आहे का? याचा शोध पोलीसांनी […]
ADVERTISEMENT
हायस्पीड इंटरनेटद्वारे ‘सिप ट्रंक सिस्टिम’ मार्फत देशासह परदेशात संपर्कासाठी कॉलिंग सेंटर चालविणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल दुकानाच्या मालकाला दहशदवाद विरोधी पथकने अटक केली आहे. कमी पैशात कॉलिंग करुन देशाचे आर्थिक नुकसान करण्यात येते होते. तर या सिस्टिमचा आधार घेवून परदेशात दहशदवाद कारवायांसाठी याचा वापर होत आहे का? याचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे. अशा प्रकारची सिस्टिम रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
रत्नागिरी शहरातून हायस्पीड इंटरनेटद्वारे इंटरनॅशनल कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसला समजलं होतं. त्यांनी ही माहिती रत्नागिरीच्या स्थानिक दहशदवाद विरोधी पथकाला कळविली. यानंतर आठवडा बाजार येथील मोबाईल दुकानात पोलिसांनी धाडसत्र सुरु केलं. इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविण्यासाठी आठवडा बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
मोबाईल दुकान मालकाच्या नावे एका खाजगी कंपनीचे हायस्पीड इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. त्यामार्फत सर्व्हरवरुन कॉलिंग सेंटर वांद्रेमधील एका इमारतीतून सुरू होते. वाईप App द्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते.
हे वाचलं का?
रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलीसांना दिली.
Kalyan: बिल्डर पिता-पुत्राची मुजोरी, क्षुल्लक कारणावरुन रहिवाशाला लोखंडी रॉडने मारहाण
ADVERTISEMENT
या प्रकरणातील मास्टर माइंड ओळखला जाणारा फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती स्थानिक एटीएसला मिळाली होती. या माहितीवरुन शुक्रवारी साळवी स्टॉप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात भा.दं.वि.कलम ४२०, ३४, आयटी अॅक्ट ४३(ह), ६६(ड), इंडियन टेलिग्राफीक अॅक्ट ४, २०, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत.
ADVERTISEMENT
इंटरनॅशनल कॉलचा वापर केवळ परदेशात बोलण्यासाठी झाला, की दहशदवाद कारवायांसाठी याचा वापर होत होता. याचा शोध शहर पोलीसांनी सुरु केला आहे. केवळ कॉलिंग करायचे असेल तर सर्व्हर रत्नागिरी व सेंटर मुंबईत करण्यामागील कारण काय ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे स्थानिक पोलीस अधिकारी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT