भाजपने उत्तर प्रदेश जिंकलं, मोदी म्हणतात तसं २०२४ लोकसभेचे निकाल निश्चीत झालेत का?

मुंबई तक

– प्रशांत किशोर, राजकीय रणनितीकार पाच पैकी चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारल्यानंतर सध्या भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. निवडणुक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निकालांवरुन २०२४ चं चित्र स्पष्ट होईल असं विधान केलं. मोदींचं हे विधान भाजप कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणार असलं तरीही प्रत्यक्षात असं काही होईल हे धरुन चालणं योग्य होणार नाही. राज्यातील निवडणुकांचे निकाल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– प्रशांत किशोर, राजकीय रणनितीकार

पाच पैकी चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारल्यानंतर सध्या भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. निवडणुक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निकालांवरुन २०२४ चं चित्र स्पष्ट होईल असं विधान केलं. मोदींचं हे विधान भाजप कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणार असलं तरीही प्रत्यक्षात असं काही होईल हे धरुन चालणं योग्य होणार नाही. राज्यातील निवडणुकांचे निकाल हे देशातील लोकसभा निवडणुकांचं चित्र ठरवू शकत नाहीत.

मी काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्येही हे बोललो होतो. राज्यातील निवडणुकांचे निकाल देशाचं चित्र ठरवू शकत नाहीत याची जाणीव खुद्द मोदींनाही आहे. उहादरण म्हणून २०१२ साली उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने बाजी मारली. परंतू त्याच उत्तर प्रदेशात २०१४ लोकसभा निवडणुकीचे निकाल काय होते? २०१७ च्या विधानसभेत तिकडे काय झालं? उत्तर प्रदेशातील जनता ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदान करत असते. त्यामुळे दोन वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत जनता कोणत्यातरी वेगळ्या मुद्द्यावरही आपलं मत देऊ शकते.

अनेकांना मी माझ्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदींना साहेब बोलल्यामुळे आश्चर्य वाटलं, पण माझ्यादृष्टीने हा मुद्दा नाही. असं समजून चाला की ही एका प्रकारची स्पर्धा आहे. ज्यात तुम्ही साखळी फेरीच्या सामन्यात एका संघाला हरवलं आहे. यानंतर अंतिम सामन्यासाठी तोच संघ तुमच्या समोर येणार आहे त्यावेळी साहजिकच तुमचं पारडं हे जड नक्कीच असेल. परंतू अंतिम सामनाही तुम्ही जिंकाल याची खात्री देता येईल का? राजकारणात दोन वर्ष हा खूप मोठा कालावधी असतो. आताच्या घडीला विधानसभा निवडणूक निकालानंतर मोदी जे काही करत आहेत त्यात खरंतर काहीच नवीन नाही, त्यांच्याजागेवर दुसरा कोणी नेता असता तर त्यानेही हेच केलं असतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp