Junnar मधील रेडिओ दुर्बिणने लावला भन्नाट शोध, नेमकं काय सापडलं?
स्मिता शिंदे, जुन्नर Radio telescope at Khodad in Junnar has made a unique discovery: जुन्नर: कॅनडा स्थित मॅकगिल विद्यापीठ आणि बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेतील खगोल शास्त्रज्ञांनी पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यामध्ये असणाऱ्या खोडद (Khodad) या गावातील येथील मीटर तरंग लांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणेद्वारे (radio telescope) केलेल्या निरीक्षणांचा वापर करत सुदूर अंतरावरच्या आकाशगंगेतील आण्विक […]
ADVERTISEMENT
स्मिता शिंदे, जुन्नर
ADVERTISEMENT
Radio telescope at Khodad in Junnar has made a unique discovery: जुन्नर: कॅनडा स्थित मॅकगिल विद्यापीठ आणि बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेतील खगोल शास्त्रज्ञांनी पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यामध्ये असणाऱ्या खोडद (Khodad) या गावातील येथील मीटर तरंग लांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणेद्वारे (radio telescope) केलेल्या निरीक्षणांचा वापर करत सुदूर अंतरावरच्या आकाशगंगेतील आण्विक हायड्रोजनमधून येणाऱ्या रेडिओ संकेतांचा शोध घेतला आहे. रेडिओ खगोल विज्ञानात 21 सेंटीमीटर उत्सर्जन निरीक्षण पद्धतीमधील हा आत्तापर्यंतचा अद्वितीय शोध मानला गेला आहे. या शोधाचे निष्कर्ष नुकतेच ब्रिटनमधील रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (junnar radio telescope makes unique discovery see what it discovered)
विश्वातील अवकाशात असलेल्या आकाशगंगा दरम्यान ताऱ्यांची निर्मिती होत असते. तारे हायड्रोजन मुलकनांच्या महाप्रचंड ढगांमधून निर्माण होतात. गुरुत्वीय बलामुळे हे मूलकण परस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. वाढत्या वस्तूमानाच्या ठराविक मर्यादेनंतर तो मेघ स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरुवात होते. त्यामुळे केंद्र भागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते.
हे वाचलं का?
…म्हणून विज्ञान कथांकडे वळलो : जयंत नारळीकर
गाभ्याकडे ढासळणाऱ्या अणूंच्या टकरीमधून आणि ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. ज्यामुळे गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. हीच तार्याची प्राथमिक अवस्था समजली जाते. प्राथमिक अवस्थेतील तारेचे तापमान काही कोटी सेंटीग्रेड झाल्यानंतर हायड्रोजनचे ज्वलन सुरू होते. यातून वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर होऊन ती ऊर्जा प्रकाश, उष्णता इत्यादी स्वरूपात उत्सर्जित होत राहते. यालाच तारा निर्माण झाला असे म्हणतात. हायड्रोजन ढगांची विविध स्थित्यंतरे, तारे निर्मितीच्या विविध अवस्था यांचे निरीक्षण केल्यास आकाशगंगाची उत्क्रांती समजते.
ADVERTISEMENT
याच अनुषंगाने 21 सेंटीमीटर तरंगलांबीवरील रेडिओ प्रारणाचे विविध प्रकारे निरीक्षण होत असते. यामध्ये डॉप्लर परिणामामुळे (डॉप्लर परिणाम: प्रारणस्रोत म्हणजे तरंग लांबीचे उगम स्थान आणि निरीक्षक यांच्यातील अंतर कमी होत असल्यास तरंगलांबी ही कमी होणे. निलसृती; किंवा तेच अंतर जास्त होत असल्यास तरंगलांबी वाढत जाणे-ताम्रसृती) आजपर्यंत मोजण्यात आलेली ताम्रसृती सर्वात जास्त म्हणजे 1.29 आढळली आहे.
ADVERTISEMENT
माणूस कधी मरणार? ‘या’ चाचणीतून तुम्हालाही कळेल!
याआधी रेडिओ खगोलशास्त्रात मोजण्यात आलेली ताम्रसृती 0.376 एवढी होती. ताम्रसृतीच्या मोजमापावरून या आकाशगंगेचे पृथ्वीपासून असलेले अंतर 88 लाख प्रकाश वर्ष असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच ही आकाशगंगा दीर्घ वर्तुळाकार असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या निरीक्षणांमधून या आकाशगंगेतील हायड्रोजनचे अस्तित्वही दुप्पट प्रमाणात असल्याने आढळून येत आहे. या निरीक्षणासंदर्भात “गुरुत्वीय भिंग” नामक निरीक्षण संकल्पना वापरण्यात आली होती. ज्यामुळे सुदूर अंतरावरून येणाऱ्या पण अन्य मार्गातील अन्य महाकाय खगोलीय घटकांमुळे वक्र झालेल्या रेडिओ प्रारणाचीही अचूक निरीक्षणे साध्य होतात.
या नावीन्यपूर्ण संशोधनासंदर्भातील मॅकगिल विद्यापीठातील शास्त्रज्ञ अर्बन चक्रवर्ती आणि भारतीय विज्ञान संस्थेतील प्राध्यापक निरुपम राय म्हणाले की, ‘या सर्वात जास्त आढळलेल्या ताम्रसृतीच्या निरीक्षणामुळे भविष्यात हायड्रोजन ढगांची विविध स्थित्यंतरे मोजण्यास मोठीच दिशा मिळेल.’ असे सांगितले. तर जीएमआरटीचे संचालक प्रमुख डॉ. यशवंत गुप्ता म्हणाले की, ‘आकाशगंगा दरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा शोध घेणे हा जीएमआरटीचा एक मुख्य उद्देश आहे.’ असे सांगत जीएमआरटी त्यासाठी उल्लेखनीय कार्य करत असल्याचे प्रतिपादन केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT