लॉकडाऊनवरून कंगनाने उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

मुंबई तक

राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने महाराष्ट्र सरकारची खिल्ली उडवली आहे. यासंदर्भात कंगनाने एक फोटो ट्विट केला आहे. कंगनाने पोस्ट केलेल्या फोटोत एका दरवाज्यावर कुलूप लागलेले दिसतेय. पण या घराच्या चारही भिंती गायब आहेत. कंगनाने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने महाराष्ट्र सरकारची खिल्ली उडवली आहे.

यासंदर्भात कंगनाने एक फोटो ट्विट केला आहे. कंगनाने पोस्ट केलेल्या फोटोत एका दरवाज्यावर कुलूप लागलेले दिसतेय. पण या घराच्या चारही भिंती गायब आहेत. कंगनाने या घराची तुलना महाराष्ट्रातील लॉकडाऊनशी केली आहे. तिच्या या फोटोने कंगनाने महाराष्ट्रात लावलेल्या संचारबंदीची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधण्याची कंगनाची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील कंगनाने महाराष्ट्र सरकार तसंच शिवसेना यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती. नुकतंच काही दिवसांपूर्वी कंगनाने महाराष्ट्र सरकारचा चंगू मंगू गँग असा उल्लेख केला होता.

महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊनच्या लावण्याच्या मुद्द्यावरून कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, “महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार आहे का? की सेमी लॉकडाऊन आहे की फेक लॉकडाऊन? काय सुरु आहे इथे? कोणीच कडक निर्णय घेण्यासाठी इच्छित नाही. प्रत्येक क्षणी डोक्यावर टांगती तलवार लटकत असताना चंगू मंगू गँग आपल्या अस्तित्वासाठी लढतायत.” तसंच काही दिवसांपूर्वी कंगनाने महाराष्ट्र सरकारवर टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली होती.