Kangana Vs Alia : ‘कन्या मान’ वरून आलियाला कंगना म्हणाली भोळ्या ग्राहकांची फसवणूक थांबवा!
अभिनेत्री आलिया भटने Alia bhatt ने मोहे या ब्रांडसाठी केलेली जाहिरात चांगलीच चर्चेत आहे. यावरून आलियाला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. फक्त हिंदू धर्मातील प्रथा-परंपराच मिळतात का? असा सवाल आलियाला अनेकांनी केला आहे. ट्विटरवर आलियाला प्रचंड प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कन्यादान नव्हे कन्या मान अशी ही मोहे ब्रांडची जाहिरात आहे. आता आलियावर टीका करणाऱ्यांमध्ये […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री आलिया भटने Alia bhatt ने मोहे या ब्रांडसाठी केलेली जाहिरात चांगलीच चर्चेत आहे. यावरून आलियाला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. फक्त हिंदू धर्मातील प्रथा-परंपराच मिळतात का? असा सवाल आलियाला अनेकांनी केला आहे. ट्विटरवर आलियाला प्रचंड प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कन्यादान नव्हे कन्या मान अशी ही मोहे ब्रांडची जाहिरात आहे. आता आलियावर टीका करणाऱ्यांमध्ये बिनधास्त बेधडक अभिनेत्री कंगनाचाही समावेश झाला आहे. तिने या जाहिरातीवरून आलियाला आणि सगळ्या जाहिरात निर्मिती करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
कंगनाने काय म्हटलं आहे तिच्या इंस्टा पोस्टमध्ये?
सगळ्या ब्रांड्सना माझी नम्र विनंती आहे की वस्तूंच्या विक्रीसाठी धर्म, अल्पसंख्याक, बहुसंख्याक असं राजकारण करू नका. हिंदू धर्म आणि त्यांच्या परंपरांचा अपमान करू नका. आपण अनेकदा टीव्हीवर बातमी पाहतो की आपल्या लष्करातील जवान शहीद झाला. त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया असते माझा दुसरा मुलगाही मी भारतमातेचीच सेवा करेल. कन्यादान असो किंवा पुत्रदान असो समाज ज्या प्रकारे या संकल्पनांकडे पाहतो त्यातून या परंपरांवर असलेला विश्वासच व्यक्त होतो. कुणीही या परंपरेला दुय्यम महत्त्व देऊ नये. पृथ्वी आणि स्त्री या दोन्हींचा उल्लेख शास्त्रांमध्ये आई असा केला गेला आहे. त्यांची पूजा केली जाते त्यांना एक अमूल्य ठेवा समजलं जातं आणि त्यांना अस्तित्वाचं केंद्र मानन्यात काहीही नुकसान नाही. असं म्हणत ही पोस्ट कंगनाने आलिया भट, मोहे ब्रांड यांना सगळ्यांना टॅग केली आहे.