vickatwedding: करण जोहर ते फराह खान; विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात हे सेलिब्रिटी असणार पाहुणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

९ डिसेंबरला विकी कौशल आणि कतरिना कैफचं शुभमंगल होणार आहे. विकी आणि कतरिनाचे कुटुंबिय,मित्रमंडळी जयपूरमधल्या सवाई माधेपूरमधील बरवारा येथे असलेल्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये पोहचले आहेत.. आजपासून ३ दिवस चालणाऱ्या या सेलिब्रेटी लग्नाची लगबग सुरू होणार आहे. मुंबई तकच्या हाती विकी- कतरिनाच्या लग्नाला कोणते सेलिब्रेटी गेस्ट येणार याची यादी लागली आहे. करण जोहर पासून फराह खानपर्यंत सेलिब्रेटी या लग्नसोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

ADVERTISEMENT

विकी कौशल आणि कतरिना कैफ आणि त्यांचे कुटुंबिय ६ डिसेंबरलाच जयपूरला पोहचले आहेत. या सेलिब्रेटी लग्नसोहळ्याला काही मोजकेच बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहे. कोरोना काळातील निर्बंधामुळे आणि नियमांमुळे मोजक्याच सेलिब्रेटींना निमंत्रणं देण्यात आली आहेत. या ग्रँड लग्नानंतर मुंबईमध्ये काही दिवसातच कतरिना आणि विकी ग्रँड रिस्पेशन पार्टी आयोजित करणार आहेत.

हे वाचलं का?

जी यादी आमच्या हाती लागली आहे त्यानुसार करण जोहर,फराह खान , नित्या मेहरा, कतरिनाचे हॉलिस्टिक डॉक्टर ज्वेअल गमादिया, कतरिनाचा ट्रेनर यास्मिन कराचीवाला, हेअर स्टाईलिस्ट अमित ठाकूर, मेकअप आर्टिस्ट डेनियल बौर,अंगद बेदी, नेहा धुपिया, सनी कौशलची गर्लफ्रेंड शर्वरी वाघ, कबिर खान,मिनी माथुर आणि अंगीरा धर यांना या लग्नसोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.

ADVERTISEMENT

तसंच अक्षय कुमार, शाहरूख खान, अनुष्का शर्मा, विराट कोहली, रोहित शेट्टी, हृतिक रोशन आणि अली अब्बास झफर हे सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. मात्र या नावांबद्दल अजूनही निश्चित माहिती कळू शकलेली नाही. हॉटेलमधील सूत्रांनुसार विकी आणि कतरिनाच्या वेडिंग प्लँनरने या फोर्टमधील ८ ते १० शाही तंबू ‘व्हीव्हीआयपी’ गेस्टसाठी बुक केले आहेत. या एका शाही तंबूचं भाडं ७० हजाररूपये आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT