कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, रोहित पवारांचा करीश्मा चालल्याने 12 जागा जिंकत एकहाती सत्ता

मुंबई तक

कर्जन नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची जादू चालली आहे. त्यामुळे 17 पैकी 12 जागा जिंकत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली काबीज केली आहे. राष्ट्रवादी 12, काँग्रेसने 3 जागा मिळाल्या आहेत तर भाजपला दोन जागा जिंकता आल्या आहेत. 17 जागा असलेली कर्जत नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 13 जागांवर मतदान 22 डिसेंबरला पार पडलं तर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कर्जन नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची जादू चालली आहे. त्यामुळे 17 पैकी 12 जागा जिंकत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली काबीज केली आहे. राष्ट्रवादी 12, काँग्रेसने 3 जागा मिळाल्या आहेत तर भाजपला दोन जागा जिंकता आल्या आहेत.

17 जागा असलेली कर्जत नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 13 जागांवर मतदान 22 डिसेंबरला पार पडलं तर उर्वरीत 4 जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. गेल्या वेळी 13 जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली होती तर भाजपच्या दुसऱ्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 11 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

नगरपंचायत – कर्जत

निकाल-

हे वाचलं का?

    follow whatsapp