Kasba Peth: कसबा मतदारसंघातील नेमकं गणित कसं होतं?
पुणे : राज्यभर गाजलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीचा (by-election results) निकाल आता अवघ्या काही तासांतच जाहीर होणार आहे. निवडणुकीदरम्यान दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं वातावरणं तापलं होतं. भाजपकडून या दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करण्यात आले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला नाही. […]
ADVERTISEMENT
पुणे : राज्यभर गाजलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीचा (by-election results) निकाल आता अवघ्या काही तासांतच जाहीर होणार आहे. निवडणुकीदरम्यान दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं वातावरणं तापलं होतं. भाजपकडून या दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करण्यात आले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला नाही. (Kasba Peth and Chinchwad Assembly by-election results are going to be announced in just a few hours.)
ADVERTISEMENT
कसब्यात रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने :
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधानामुळे कसबा पेठेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर भाजपकडून हेमंत रासने यांना तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघेही माजी नगरसेवक राहिले आहेत आणि ओबीसी समाजातून येतात. दोघांसाठीही बड्याबड्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होणार हे आता अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
कसबा पोटनिवडणूक: पैसे वाटल्याचा Video व्हायरल, मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा ड्रामा
हे वाचलं का?
कसबा पेठेत झालेलं मतदान :
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहेत. यापैकी १ लाख ३६ हजार ९८४ पुरुष मतदार आहेत. तर १ लाख ३८ हजार ६९० महिला मतदार आहेत. यापैकी ७४ हजार २१८ पुरुष मतदारांनी मतदान केलं होतं. तर ६३ हजार ८०० महिला मतदारांनी अशा एकूण १ लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान ५०.०६ टक्के मतदान झालं होतं.
ADVERTISEMENT
कसबापेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण :
कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रात मजमोजणी पार पडणार आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे.
ADVERTISEMENT
मतमोजणीच्या २० फेऱ्या :
कसबा पेठेत मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठी इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. प्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५० अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स ची पडताळणी केली जाणार आहे.
मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, पोलीस समन्वय कक्ष, निवडणूक उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासाठी कक्ष याबाबतची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळ व्यवस्था गाडगे महाराज विद्यालय कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या मैदानावरील मोकळ्या जागेत असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती किसवे- देवकाते यांनी दिली.
कसब्यात हे फॅक्टर ठरणार निर्णायक :
-
ब्राह्मण समाजाची नाराजी :
कसबा पेठेत उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपकडून ब्राह्मण समाजातील व्यक्तीला उमेदावरी न दिल्याने मोठी नाराजी पसरली होती. अनेक ठिकाणी नाराजीचे बॅनर्स लावण्यात आले होते. कसबा पेठ मतदारसंघ तसा ब्राह्मणबहुल म्हणून ओळखला जातो आणि ब्राह्मण मतदार हे भाजपचे पारंपरिक मतदार ओळखले जातात. गेल्या २५ वर्षांपासून इथले आमदार ब्राह्मण समाजातले राहिलेत. पण पहिल्यांदाच भाजपने ब्राम्हणेत्तर समाजातल्या व्यक्तीला तिकीट दिलं. त्यामुळे ब्राम्हण मतदार भाजपवर नाराज असल्याचं वेळोवेळी समोर आलं. मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनीही तसे संकेत दिले होते.
-
सदाशिवपेठ विरुद्ध कसबापेठ
हेमंत रासने यांचा सदाशिवपेठ, शनिवारपेठ, गुरुवारपेठ अशा पेठांमध्ये प्रभाव आहेत. तर कसबापेठ, शुक्रवारपेठ, रास्तापेठ, नाना पेठ इलाख्यात रवींद्र धंगेकरांचा प्रभाव आहे. गेल्या २५ वर्षांपासून सदाशिव पेठ इलाख्यालाच प्रतिनिधित्व मिळत आलंय. दुसरीकडे मतदारांमध्ये ५०-६० टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या कसबापेठेला प्रतिनिधित्वापासून वंचित राहावं लागलंय. हा संघर्षही या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समोर आला. धंगेकरांच्या रूपाने पहिल्यांदाच कसबा पेठेतल्या उमेदवाराने तगडी लढत निर्माण केली.
-
हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर : मविआची एकी आणि मनसे फॅक्टर
कसब्यात मविआमधील सगळेच एकदिलाने काम करताना दिसले. दुसरीकडे मनसेनं भाजपला पाठिंबा दिला. मनसेचे मतदारही निर्णायक आहेत. गेल्यावेळी भाजपच्या मुक्ता टिळकांना ७५ हजार, काँग्रेसच्या अरविंद शिंदेंना ४७ हजार, सेना बंडखोर विशाल धनवडेंना १४ हजार आणि मनसेच्या अजय शिंदेंना ८ हजार मतं मिळाली. विशाल धनवडे हे सध्या ठाकरे गटात आहेत. कधीकाळी आपले सहकारी असलेल्या धंगेकरांसाठी काही मनसैनिकही प्रचाराला उतरलेत. त्यामुळे मविआच्या मतांमधली एकजूट आणि मनसे मतदारांचं धंगेकरांना पाठबळ मिळाल्यास भाजपसाठी निवडणूक जड जावू शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT