Kiran Gosavi : किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात; अटकेची प्रकिया सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

कॉर्डेलिया क्रूझशिप जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार आणि आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) अखेर पोलिसांच्या हाती लागला. पुणे पोलिसांनी किरण गोसावीला ताब्यात घेतलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी ही माहिती दिली. गोसावीला अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. (Pune Police detained Kiran Gosavi)

ADVERTISEMENT

मुंबईच्या समुद्री सीमवेर एनसीबीने एका क्रूझ जहाजावर कारवाई केली होती. जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने धाड टाकली होती. या प्रकरणातील साक्षीदार असलेला किरण गोसावी आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पुणे, पालघरसह चार फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. तसेच पुणे पोलीस आधीपासूनच त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेतलं.

क्रूझ छाप्यापासून आजपर्यंत काय काय घडलं वाचा काय म्हणतोय किरण गोसावी?

हे वाचलं का?

किरण गोसावीने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पोलिसांनी गुप्तवार्ता विभागाच्या मदतीने त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. गोसावीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितात्र गुप्ता यांनी दिली. त्याच्याविरुद्ध अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पालघरमध्ये दोन तरुणांना लुबाडलं : आर्यन खानला पकडून आणलेल्या किरण गोसावीवर गुन्हा दाखल

ADVERTISEMENT

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून मलेशियातील हॉटेलमध्ये नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करायचा आणि पैसे उकळायचा. त्याने 3 लाख रूपये उकळल्याचा गुन्हा चिन्मय देशमुख यांच्या तक्रारीवरून 2018 साली पुणे पोलिसात दाखल करण्यात आलेला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथक तयार केली होती. किरण गोसावीवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तर तिसरा गुन्हा अंधेरीतील पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर चौथा गुन्हा पालघरमधील दोन तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT