अन्नपुर्णा रूपातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई
बुधवारी अश्विन शुद्ध पौर्णिमेनिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईला अन्नपूर्णा रूपात सजली. आईच्या नवरात्र महोत्सवाची सांगता म्हणून दरवर्षी याच दिवशी दुपारी हजारो लोकांचा महाप्रसाद संपन्न होतो. (कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून हा महाप्रसाद फक्त प्रतिकात्मक संपन्न होतो.) महाप्रसाद म्हणलं की देवळातलं वातावरणच वेगळं होतं. आदल्या रात्री उशिरापासून सुरू झालेली तयारी. मोठे दरवाजे बंद करून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बुधवारी अश्विन शुद्ध पौर्णिमेनिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईला अन्नपूर्णा रूपात सजली.
हे वाचलं का?
आईच्या नवरात्र महोत्सवाची सांगता म्हणून दरवर्षी याच दिवशी दुपारी हजारो लोकांचा महाप्रसाद संपन्न होतो. (कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून हा महाप्रसाद फक्त प्रतिकात्मक संपन्न होतो.)
ADVERTISEMENT
महाप्रसाद म्हणलं की देवळातलं वातावरणच वेगळं होतं. आदल्या रात्री उशिरापासून सुरू झालेली तयारी. मोठे दरवाजे बंद करून पंगतींच केलेलं नियोजन तरीही बाहेर रांगा लावून भक्त उभे असतात.
ADVERTISEMENT
मातृलिंगाची महापूजा होऊन महाप्रसाद सुरू होतो. पंक्ती मागं पंक्ती उठतात हरेकजण तृप्त होतो.
मंदिर प्राकार धुवून स्वच्छ केलं जातं आणि मग वेध लागतात ते रात्री पालखीचे.
अंबाबाईच्या परंपरेत आश्विन पौर्णिमेपासून पाच पौर्णिमा पालखीच्या असतात त्यात ही पहिली पौर्णिमा भक्तांची.
नवान्न पौर्णिमेला अन्नपूर्णा रूपात सजलेल्या जगदंबेला भक्त अन्नदात्याला सुखी समाधानी समृद्ध कर आणि कुणालाही भुकेच्या वेळेला अन्नाची भ्रांती पडू नये. सर्वांसाठी अन्नाचा हरेक कण पोषक ठरो, अशी प्रार्थना करतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT