मूक-बधिर तरुण कामगाराची गोळ्या घालून हत्या, गुन्हेगार मोकाट
crime news : बिहारच्या समस्तीपुरातील हसनपुर ठाणे क्षेत्रातील रामपुर गावाजवळ अज्ञातांना 22 वर्षीय मूक-बधीर मजूरावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. चितरंजन पासवाल असे मजूराचे नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

22 वर्षीय मूक-बधीर मजूरावर गोळीबार

गोळीबारात तरुणाची हत्या
Crime News : बिहारच्या समस्तीपुरातील हसनपुर ठाणे क्षेत्रातील रामपुर गावाजवळ अज्ञातांना 22 वर्षीय मूक-बधीर मजूरावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. चितरंजन पासवाल असे मजूराचे नाव आहे. दरम्यान, त्याला एका रुग्णालयात पाठवण्यात आले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, 7 जणांचा मृत्यू, मृतांपैकी 3 जण महाराष्ट्रातील यवतमाळचे
मजूराच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता, संबंधित हत्यारांचा पोलिसांनी तपास केला आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत चितरंजन पासवान आपलं काम करून घरी परतत होता. अशावेळी तो एका त्रिशूळ चौकाजवळ असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारात मजूर चितरंजन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अशावेळी घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी पीडित चितरंजनला एका रुग्णालयात पाठवले. मात्र, अशावेळी चितरंजनला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
कसलाही वाद नसून निष्पाप मजूरावर गोळीबार
स्थानिकांनी या घटनेची माहिती दिली की, चितरंजनचे कोणाशीही कसलेच भांडण नव्हते. मग त्याच्यावर गोळीबार का केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यादरम्यान, हत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. हसनपुर पोलीस ठाण्याचे मुकेश कुमार यांनी सांगितलं की, पोलीस संबंधित प्रकरणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच या प्रकरणाचा खुलासा करण्यात येईल, असे बोललं जात आहे.
हेही वाचा : हॉटेल भाग्यश्री बंद म्हणून पुन्हा तोडफोड; दोन तरूणांना पकडलं, नागेश मडके म्हणाले...
या प्रकरणात रोसराच्या डीएसपी सोनम कुमारी यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, नातेवाईक संतप्त झाले, त्यांना शांत केल्यानंतर मृतदेह हा समस्तीपूर येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. हत्येची कारणे तपासली जात आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही, अशावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आणि संशयितांच्या शोधात छापे टाकण्यास सुरुवात केली .