पोलिसांचा गोळीबार, गुन्हेगार ठार... पुणे पोलिसांची मोहोळमध्ये सिनेस्टाईल कारवाई, पत्नीचे गंभीर आरोप

मुंबई तक

शाहरूखवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा आणि कालेपडाळ यासह विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Pune : पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारांचा हैदोस सुरू आहे. पुण्यातील हडपसरमध्ये सय्यद नगरचा रहिवासी असलेला कुख्यात गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 30) हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात आज पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याला ठार करण्यात आलं. 

हे ही वाचा >> मुलीचं नाव, घराचं नाव 'काशी', गुप्त काशीला जातानाच हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये यवतमाळच्या तिघांचा अंत

कोण होता शाहरूख?

शाहरूखवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा आणि कालेपडाळ यासह विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्यावर महाराष्ट्र नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गतही गुन्हा दाखल होता. तो टिपू पठाण टोळीशी संबंधित होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी एन्काऊंटर केला?

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेख लांबोटी गावात आपल्या नातेवाईकाच्या घरी लपून बसल्याचं समजलं. यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळ पोलिस ठाण्याच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करत त्याला पकडण्यासाठी छापा टाकला. 

हे ही वाचा >> हॉटेल भाग्यश्री बंद म्हणून पुन्हा तोडफोड; दोन तरूणांना पकडलं, नागेश मडके म्हणाले...​​​​​

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेखने पिस्तूलातून पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात शेख जागीच ठार झाला. ही माहिती पोलिसांनी दिली आहे. 

हे वाचलं का?