आरारारारा खतरनाक! सोन्याचे दर भिडले गगनाला; 22 अन् 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव वाचून घामच फुटेल

मुंबई तक

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून देशात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

सोन्याचा भाव, चांदीचा दर, सोने किती स्वस्त झाले, आज सोन्याचा चांदीचा दर, आज सोन्याच्या दरात घसरण, चंदीचा दर, सोना चंदीचा भाव
चित्र: AI
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून देशात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलंय. एका आठवड्यात सोनं 3710 रुपयांनी महागलं आहे. इस्त्राईल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठे बदल झाले आहेत. अशातच आज 15 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 3400 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव लाखाच्या पार झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93 हजारांच्या पुढे गेले आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 101680 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93200 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 101680 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93200 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 101710 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93230 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp