मामी भाच्यासोबत पळून गेली..मामाची सटकली अन् घडलं भयंकर! मामा घरी नसताना काय घडलं?

मुंबई तक

Married Woman Viral Love Story :  उत्तर प्रदेशमध्ये मामी-भाच्याच्या प्रेमकहाणीमुळे खळबळ उडाली आहे. येथील एक तरुणाचं त्याच्या सख्ख्या मामीसोबत प्रेम जडलं अन् ते दोघेही पळून गेले.

ADVERTISEMENT

फतेहाबाद टोहाणामध्ये पत्नी आणि प्रियकराची हत्या करून पतीने खळबळ उडवली, प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट
फतेहाबाद टोहाणामध्ये पत्नी आणि प्रियकराची हत्या करून पतीने खळबळ उडवली, प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मामा घरी नसताना भाचा घरी यायचा आणि..

point

मामीचे भाच्यासोबत होते अनैतिक संबंध, मामाला कळताच..

point

मामाने पोलिसांत केली तक्रार दाखल

Married Woman Viral Love Story :  उत्तर प्रदेशमध्ये मामी-भाच्याच्या प्रेमकहाणीमुळे खळबळ उडाली आहे. येथील एक तरुणाचं त्याच्या सख्ख्या मामीसोबत प्रेम जडलं अन् ते दोघेही पळून गेले. धक्कादायक बाब म्हणजे पळून गेलेल्या मामीने घरातील सोनं आणि रोख रक्कमही लंपास केली. या घटनेमुळं महिलेचा पती गुलबहारला मोठा धक्का बसला आहे. त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून न्यायाची मागणीही केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बदायूं जिल्ह्यातील आहे. 10 जूनच्या सकाळी महिलेनं डॉक्टरकडे जायचं आहे, असं तिच्या घरच्यांना सांगितलं. पण काही वेळ उलटल्यानंतरही ती महिला परत घरी आली नाही, तेव्हा पतीचं टेन्शन वाढलं. पतीने जेव्हा त्याच्य पत्नीला फोन केला, तेव्हा तिचा फोन बंद असल्याचं समोर आलं.

हे ही वाचा >> मुलीचं नाव, घराचं नाव 'काशी', गुप्त काशीला जातानाच हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये यवतमाळच्या तिघांचा अंत

महिलेचा पती गुलबहार दिल्लीत मजुरी करून कुटुंबाचा खर्चा भागवतो. जेव्हा त्याला पत्नीबाबत कळलं, तेव्हा तो गावी परत गेला. तेव्हा त्याला कळलं की, त्याची पत्नी त्याच्याच भाच्यासोबत पळून गेली आहे. त्यानंतर पतीच्या पायाखालची वाळूच सरकली. 
मामा घरी नसताना भाचा त्याच्या घरी मामीला भेटायला यायचा. अफजल मामाच्या अनुपस्थितीत मामीच्या घरी नेहमीच यायचा. याचदरम्यान, अफजल आणि खुशनमा यांच्यातील प्रेमसंबंध वाढले. 

घरातून सोनं आणि रोख रक्कम लंपास केली

महुलाने भाच्यासोबत पळून जाताना घरातील सोनं-चांदी आणि 30 हजार रुपयांनी रोख रक्कम लंपास केली. गुलबहारने पोलीस स्थानकात पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण कौटुंबिक असल्याने पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही. पण पोलीस अफजल आणि गुलबहारच्या पत्नीचा शोध घेत आहे, असं समजतंय.

हे ही वाचा >> हॉटेल भाग्यश्री बंद म्हणून पुन्हा तोडफोड; दोन तरूणांना पकडलं, नागेश मडके म्हणाले...

हे वाचलं का?

    follow whatsapp