नग्न अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह, आजबाजूला सापडल्या 'या' वस्तू!
Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमधील कॅन्ट परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह हा नग्न अवस्थेत होता अशी तपासादरम्यान पोलिसांनी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मेरठमधील कॅन्ट परिसरात एका महिलेचा मृतदेह

बलात्कार करुन हत्या केल्याचा पोलिसांनी केला संशय व्यक्त
Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमधील कॅन्ट परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह हा नग्न अवस्थेत होता अशी तपासादरम्यान पोलिसांनी माहिती दिली आहे. अशातच आता तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. महिलेच्या डोक्यावर खोल जखमांच्या खुणा असल्याने बालात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोस्टमॉर्टमच्या अहवालावरून हे स्पष्ट होईल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. संबंधित घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली आहे.
हेही वाचा : भाचा आणि मामीमध्ये अनैतिक संबंध, मामी मामाला सोडून भाच्यासोबत पळाली! सोबत...
मेरठच्या कॅन्ट परिसरातून दुर्गंधी
मेरठच्या कॅन्ट परिसरातून दुर्गंधी येत असल्याची स्थानिकांनी तक्रार केली आहे. त्यानंतर तपासात एका महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला. अशावेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले. दरम्यान, मृतदेहाची अवस्था पाहता हा मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याचा पोलिसांनी अंदाज बांधला. मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी मास्क बांधले आणि मृतदेह ताब्यात घेतला.
मृतदेहाजवळून चप्पल, लॅपटॉ बॅग आणि काही कपडे सापडले आहेत. याचा वापर पुराव्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. दरम्यान, मृतदेहावर खोल जखमा आढळल्या होत्या. तसेच शरीरावर रक्ताचे डागही होते, ज्यामुळे हत्येचा संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी तातडीने मृतदेहाचा पंचनामा तयार केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.
संबंधित प्रकरणात आयुष विक्रम सिंह यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. ते म्हणाले की, मृतदेह हा एका महिलेचा असून तिच्या डोक्यावर खोलवर जखमा झाल्या आहेत. मृतदेह हा दोन दिवसांपूर्वीचा असून भोवतालचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. दरम्यान, महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली असेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : नेत्यासोबत भररस्त्यात शारीरिक संबंध, व्हायरल व्हिडिओमधील महिलेचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती!
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत. फॉरेन्सिट पथकाने घटनास्थळावरून काही वस्तु गोळा केल्या आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी स्थानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचं खरं गुढ अद्यापही उकललं गेलं नाही, ते लवकरच उकलेल, असे पोलिसांनी सांगितलं आहे.