भाचा आणि मामीमध्ये अनैतिक संबंध, मामी मामाला सोडून भाच्यासोबत पळाली! सोबत...
crime news : उत्तर प्रदेशातील बिदायू जिल्ह्यात, अफझल नावाचा एक तरुण त्याच्याच मावशीच्या प्रेमात पडला. त्याच्या मावशीचे नाव खुष्णुमा आहे आणि तो त्याच्या खुष्णुमासोबत पळून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अफजल नावाचा तरुण आपल्याच मामीच्या प्रेमात पडला

मामीनं घरातून सोनं चांदी आणि 30 हजार घेऊन झाली फरार
Crime News : उत्तर प्रदेशातील बिदायू जिल्ह्यात एका अफजल नावाचा तरुण आपल्याच मामीच्या प्रेमात पडला. त्याच्या मामीचे नाव हे खुशनुमा असून तो आपल्या खुशनुमाला घेऊन पळून गेला आहे. या घटनेची माहिती अफजलचा मामा गुलबहारला समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गुलबहार हा सध्या दिल्लीत मजूरीचे काम करतो आणि आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करतो. या प्रकरणी त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा : नेत्यासोबत भररस्त्यात शारीरिक संबंध, व्हायरल व्हिडिओमधील महिलेचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती!
औषध आणते असं सांगून खुशनुमा गेली पळून
मिळालेल्या माहितीनुसार, महिला खुशनुमा 10 जून रोजी सकाळी डॉक्टरांकडून औषध आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. पती गुलबहारने अनेकदा फोनद्वारे संपर्क केला तरी, तिचा मोबाईल बंदच लागत होता.
पती गुलबहारला आपल्या पत्नीवर संशय आल्याने तो त्याच्या गावी आला. तपास केला असता, आपली पत्नी खुशनुमा ही आपल्याच भाच्यासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली. गुलबहार आणि खुशनुमाच्या विवाहाला काही काळ लोटून गेला होता. गुलबहर पोटापाण्याच्या प्रश्नसाठी दिल्ली येथेच राहत होता. यामुळे पत्नी खुशनुमा ही एकटी पडू लागली. अशावेळी तिने अफजलला जवळ केलं आणि त्याच्यासोबत तिने संबंध जोडले.
याचा त्रास हा गुलबहरला झाला. लोक सांगतात की, मामा नसल्याने अफजल मामी खुशनुमाला भेटण्यासाठी यायचा. याचदरम्यान, दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. संबंधित प्रकरणात आरोप आहे की, पत्नी खुशनुमा पळून जाताना सोबत 30 हजार रक्कम आणि सोने-चांदी घेऊन फरार झाली.
हेही वाचा : निब्बा निब्बीचं लव्ह! क्रशशी बोलतो म्हणून तरुणाने गुजरातहून गाठलं पुणे अन् अल्पवयीन तरुणावर चाकूने केले सपासप वार
पीडित गुलबहारकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
दरम्यान, पीडित गुलबहारने पोलीस ठाण्यात अफजलविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच पत्नीचा शोध घ्यावा आणि न्याय मिळावा अशी विनंती केली. हे कौटुंबिक प्रकरणार असल्याने पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही, परंतु पोलीस आता खुशनुमा आणि अफजलचा शोध घेत आहेत.