निब्बा निब्बीचं लव्ह! क्रशशी बोलतो म्हणून तरुणाने गुजरातहून गाठलं पुणे अन् अल्पवयीन तरुणावर चाकूने केले सपासप वार
pune crime news : पुण्यात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. धारदार चाकूने सपासप वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी गुजरातच्या बडोदरा येथून पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना
प्रेम प्रकरणातून गुजरातच्या तरुणाने पुण्यातील तरुणाला संपवलं
Pune Crime News : पुण्यात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. धारदार चाकूने सपासप वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी गुजरातच्या बडोदरा येथून पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना गुरुवारी देहू रोड पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.
हेही वाचा : 12 वर्षानंतर गुरू आणि शुक्र आले एकत्र 'या' राशीच्या लोकांची पाचही बोटं राहणार तुपात
नेमकं काय घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या देहू येथील थॉमस कॉलनीचा रहिवाशी असणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा दिलीप मोरयावर धारदार चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याची हत्या करण्यात आली. याचदरम्यान त्याच्याच एका चुलत भावाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात तरुण हा गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्येचं कारण आता समोर आलं आहे. ही हत्या एका प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याची सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात आता पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहेत.
हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव दिलीप असे होते. तर हल्लेखोराचे नाव सनी सिंग राजपूत असे होते. सनी गुजरातहून देहूरोड येथे आला आणि त्याने निष्पाप दिलीपची हत्या केली आहे. सनी सिंग राजपूतसोबत एक तरुणी सतत बोलायची. मात्र, मागील काही महिने तिनं सनीशी बोलणं बंद केलं होतं.
त्यानंतर ती दिलीप नावाच्या तरुणासोबत बोलू लागली होती. ही माहिती सनी सिंगला होताच त्याने टोकाचं पाऊल उचललं. तो गुजरातहून पुण्यातील देहूरोडला आला आणि त्यानं दिलीपची हत्या केली. दरम्यान, दिलीपचा चुलत भाऊ अरुण मोरयाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले. या हत्येनंतर सनी हा गुजरातला पळून गेला.










