'काका आणि तीन भावांनी माझ्यासोबत...' पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेसोबत घडलं भयंकर
गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चार जणांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकी घटना काय आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काका आणि तीन भावांनी माझ्यासोबत...
पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेसोबत घडलं भयंकर
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 30 वर्षीय गरोदर महिलेने चार जणांवर वारंवार बलात्कार, मारहाण, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 20 ऑगस्ट रोजी अख्तर रजबशाह फकीर, त्याचे भाऊ आरिफ व इलियास आणि त्यांचा काका सलीमशाह जुमाशाह फकीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील बलात्कार, मारहाण, धमकी देणे यांसारख्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील ही घटना आहे. महिलेने आरोपी केला आहे की तिच्यावर धर्मपरिवर्तानासाठी देखील आरोपी दबाव टाकत होते.
पाच महिन्यांची गरोदर असूनही अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पाच महिन्यांची गरोदर असून गेल्या महिन्यात तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले. पीडितेचा पती तिच्यापासून वेगळा राहत असून अख्तर हा त्याच्या ओळखीचा होता. अख्तरने तिच्या आजारी आजोबांवर तांत्रिक उपचार करण्याचे सांगून तिच्याशी संपर्क वाढवला होता. यापूर्वीही महिलेने अख्तर आणि त्याच्या नातेवाईकांवर पालणपूर ईस्ट पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात अख्तरला अटक झाली होती. परंतु, फरार असलेल्या त्याच्या भावांनी पीडितेला आणि तिच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने, तिने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन तडजोड केली. त्यानंतर 16 जून रोजी अख्तरची तुरुंगातून सुटका झाली होती.
हे ही वाचा : 'पप्पा, मला सोडून जाऊ नका', कुणालच्या मावशीने आणखी काय सांगितलं?
खासगी व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल
तुरुंगातून सुटल्यानंतर वाद मिटतील या अपेक्षेने महिला अख्तरसोबत धानेरा तालुक्यातील पेंगिया गावात राहण्यास गेली. मात्र, तिथे गेल्यावरही तिची परिस्थिती बदलली नाही. गरोदर असतानाही अख्तरने तिच्यावर अत्याचार व मारहाण सुरूच ठेवली. तिचे काही खासगी व्हिडिओ तिच्या नकळत शूट करून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले गेले. तसेच तिन्ही भाऊ आणि त्यांच्या काकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?
गर्भातील बाळाची जबाबदारी घ्यायला नकार
21 जुलै रोजी चारही आरोपींनी पीडितेला मारहाण करून घरातून हाकलून दिले तसेच तिच्या गर्भातील बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने एका दुकानदाराच्या मदतीने '181' महिला हेल्पलाइनशी संपर्क साधला आणि आईच्या मदतीने लखणी येथे पोहोचून पोलिसांत तक्रार दाखल केली. बनासकांठा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आता महिलेने केलेले आरोप, जुने गुन्हे, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग आणि धर्मपरिवर्तनाच्या दाव्यांशी संबंधित सर्व पुराव्यांची कसून चौकशी करत आहेत.
