पुण्यात वाहनचालकाने गाठला बेशिस्तपणाचा कळस, विनापरवाना कार फुटपाथवर चढवली अन् तरुणीला ठोकर देत संपवलं

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यातील कात्रजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 जून रोजी शुक्रवारी पुण्यातील कात्रजमध्ये एका कार चालकाने 20 वर्षीय विद्यार्थीनीला धडक दिली आहे. दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान विद्यार्थीनी इंटर्नशिप करुन घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

pune crime news a driver hit a student in Katraj at Pune and the girl died
pune crime news a driver hit a student in Katraj at Pune and the girl died
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील कात्रजमध्ये एक धक्कादायक घटना घडली

point

कात्रजमध्ये एका कार चालकाने 20 वर्षीय विद्यार्थीनीला दिली धडक

Pune Crime News : पुण्यातील कात्रजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 जून रोजी शुक्रवारी पुण्यातील कात्रजमध्ये एका कार चालकाने 20 वर्षीय विद्यार्थीनीला धडक दिली आहे. दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान विद्यार्थीनी इंटर्नशिप करुन घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. संबंधित प्रकरणात कार चालकाकडे कोणताही परवाना नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

हेही वाचा : निब्बा निब्बीचं लव्ह! क्रशशी बोलतो म्हणून तरुणाने गुजरातहून गाठलं पुणे अन् अल्पवयीन तरुणावर चाकूने केले सपासप वार

नेमकं काय घडलं?

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीसोबतच वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचा कळस दिसून आला आहे. दररोज गुन्ह्यांसोबतच वाहतुकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कात्रजमधील गोकुळनगर येथील एका खासगी क्लिनिकमध्ये डी.फार्मची विद्यार्थीनी श्रेया येवले ही इंटर्नशिप करुन घरी परतत होती. अशावेळी एका विना परवाना कार चालकाने थेट तरुणीच्या अंगावर कार घातली आणि यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनं पुण्यातील वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती सांगितली आहे. ज्या कारद्वारे अपघात करण्यात आला ती कार खासगी फ्लिट ऑपरेटरची होती. ती कार सतीश होनमाने या व्यक्तीला देण्यात आली होती. सतीश होनमाने यांनी ती कार दत्तात्रय गाडेकर यांना चालवण्यास दिली असताना ही घटना घडली. दत्तात्रेय गाडेकर त्यांच्याकडे कार परवाना नसल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

प्राथमिक तपासातून असे दिसून आले की, गाडेकर यांनी ज्या व्यक्तीला गाडी चालवण्यास दिली होती त्यांनाच गाडीतील फारसे ज्ञान नव्हते. त्यांनी गाडीवरील नियंत्रण गमावून  विद्यार्थीनीला ठोकर दिली आणि अपघात झाला. या अपघातात तरुणी मृत पावल्याची माहिती समोर आली. 

हेही वाचा : 12 वर्षानंतर गुरू आणि शुक्र आले एकत्र 'या' राशीच्या लोकांची पाचही बोटं राहणार तुपात

दरम्यान, पोलीस संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अपघातातील असणारी कार होनमाने यांनी गाडेकर यांना का दिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत दोघांनाही अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp