वासनांध तरूण महिलेसोबत नको ते करायला गेला, महिलेने तरुणाचं गुप्तांगच कापलं!
मुझफ्फरपूरमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर महिलेने थेट चाकूने हल्ला करत त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

मुझफ्फरपूर: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एका गावात खळबळजनक घटना घडली. येथे, एका महिलेने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर अशा प्रकारे हल्ला केला की ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपीपासून स्वतःचा बचाव करताना महिलेने थेट भाजी कापणाऱ्या चाकूचे आरोपीचं गुप्तांग कापलं. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत आरोपीला स्थानिक रुग्णालयात उपचारानंतर आणण्यात आलं. त्यानतंर त्याला मुझफ्फरपूरमधील SKMCH येथे रेफर करण्यात आलं.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने यापूर्वी महिलेला काही पैसे उधार दिले होते. बुधवारी रात्री उशिरा, तो कर्ज परत मागण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी महिला घरी एकटी होती. या तरुणाने परिस्थितीचा फायदा घेत महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केला, परंतु जेव्हा तरुणाने ऐकले नाही आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला तेव्हा महिलेने जवळच ठेवलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने तरुणाच्या गुप्तांगावर हल्ला केला.
हे ही वाचा>> सोनम आणि जितेंद्र कुशवाहा यांच्यातील नात्याबाबत खुलासा, लाखो रुपयांचा व्यवहार झाला उघड
महिलेचा आरडाओरडा ऐकून जवळचे गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी तरुणाला ताबडतोब रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु तरुणाची गंभीर प्रकृती पाहून त्याला SKMCH मध्ये रेफर करण्यात आले.
जखमी आरोपीचे नाव राजा ठाकूर असे आहे. राजा ठाकूर याने आपली बाजू मांडताना सांगितले की, तो फक्त त्याचे कर्ज दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेला होता. त्याचवेळी महिलेने अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांनी बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप निराधार असल्याचेही यावेळी म्हटले आहे.
हे ही वाचा>> Sangli Crime: वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याचा घेतला जीव, पत्नीने लग्नाच्या 15 दिवसातच थेट कुऱ्हाडीनेच...
दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर ग्रामीण एसपी विद्यासागर म्हणाले की, पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे. सध्या कोणत्याही पक्षाकडून लेखी तक्रार मिळालेली नाही. अर्ज मिळाल्यानंतर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. घटनेनंतर परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे महिलेच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे, तर दुसरीकडे पोलीस तपासानंतरच सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे.