Mumbai Police : ६० दिवसांत करा भाडेकरूची पडताळणी, का आणि किती आहे महत्त्वाची?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : घरमालकांना ६० दिवसांच्या आत भाडेकरुची पडताळणी करून घेण्याबाबतचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मार्गदर्शक पत्रक जारी केले आहे. तुम्ही तुमची कोणतीही मालमत्ता भाड्याने देत असाल तर त्याची सर्व माहिती द्यावी लागेल, असे मुंबई पोलिसांनी या आदेशात म्हटले आहे. हा आदेश ८ मार्चपासून लागू झाला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (The Mumbai Police has issued an advisory asking all property owners to verify the tenants within 60 days.)

ADVERTISEMENT

काय आहे आदेश?

मुंबई पोलिसांचा हा आदेश घरमालक आणि व्यवसायिक मालमत्ताधारक लोकांसाठी आहे. जर मालमत्ता किंवा घर भाड्याने दिले असेल तर भाडेकरूची सर्व माहिती पोर्टलवर द्यावी लागेल,

हे वाचलं का?

असा आदेश का जारी करण्यात आला आहे?

समाजाला घातक ठरणाऱ्या लोकांमुळे शांतता भंग होण्याची किंवा सुव्यवस्था बिघडण्याची किंवा मानवी जीवनाला धोका निर्माण होण्याची तसेच खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळेच सर्व भाडेकरूंचा तपशील सिटीझन पोर्टलवर नोंदवणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

भाडेकरू परदेशी असल्यास काय?

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांच्या आदेशात म्हटले आहे की, भाडेकरू परदेशी असल्यास त्याचे सर्व तपशील देखील द्यावे लागतील. याशिवाय तो मुंबईत का राहतो? याचीही माहिती देणं बंधनकारक आहे.

तपशील कसा द्यायचा?

मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, घर किंवा कोणतीही संपत्ती भाड्याने देण्यासाठी पोलिसांकडून एनओसी आवश्यकता भासणार नाही. पण भाडेकरूची पडताळणी आणि तपशील देणं गरजेचं आहे.

तुम्ही भाडेकरूचा तपशील पोलिसांना तीन प्रकारे देऊ शकता

1. ऑनलाइन.

2. संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज करून.

3. पोस्टाद्वारे अर्ज संबंधित पोलिस स्टेशनला पाठवून.

ऑनलाइन पद्धत काय आहे?

  • सर्वप्रथम mumbaipolice.gov.in या वेबसाइटवर जा. येथे ‘रिपोर्ट’ मेनूवर जा आणि ‘टेनंट इन्फॉर्मेशन’ या टॅबवर क्लिक करा.

  • इथं एक फॉर्म उघडेल. यामध्ये आधी मालकाला त्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर मालमत्तेचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर भाडेकरू आणि तो काय करतो याची माहिती द्यावी लागेल. शेवटी भाडेकरूच्या कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीची माहिती द्यावी लागेल.

  • इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की, मालकाचा मालमत्ता पत्ता आणि भाडेतत्वावर द्यायची मालमत्ता यांचा पत्ता वेगळा असावा.

  • याशिवाय मालमत्ता मालक आणि भाडेकरू यांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे. यात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीसांच्या बजेटमध्ये मराठवाड्याला काय मिळालं?

भाडेकरूचे पोलिस व्हेरिफिकेशन का आवश्यक आहे?

  • मालमत्ताधारकाने भाडेकरूचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे. असे न करणे हे आयपीसी कलम 188 चे उल्लंघन आहे. दोषी आढळल्यास एक महिन्याचा तुरुंगवास किंवा 200 रुपये किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

  • प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये भाडेकरूचा फॉर्म असतो, ज्यामध्ये भाडेकरूची सर्व माहिती भरता येते. यामध्ये भाडेकरूचा प्रत्येक तपशील द्यावा लागतो. हे देखील महत्त्वाचे आहे कारण भाडेकरूचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड असल्यास ते पोलिस पडताळणीवरून कळते. ही पडताळणी ऑनलाइनही करता येईल.

  • मॉडेल टेनन्सी अॅक्ट 2021 नुसार मालमत्ता मालक आणि भाडेकरू यांच्यात लिखित भाडे करार असणे आवश्यक आहे. हा करार 11 महिन्यांसाठी असतो. या करारात भाडेकरू किती दिवस राहणार, भाडे किती देणार, डिपॉझिटची रक्कम किती, ही सर्व माहिती देणं गरजेचं आहे.

  • कराराची तारीख संपल्यानंतर घरमालक ठेवू इच्छित असल्यास पुन्हा करार करावा लागेल. करार संपल्यानंतर, भाडेकरू घर रिकामे करत नसेल किंवा घर रिकामे करू शकत नसेल, तर त्याला वाढीव भाडे घरमालकाला द्यावे लागेल.

Maharashtra Budget 2023 : तिजोरी उघडली! फडणवीसांकडून घोषणांचा पाऊस

घरमालक आणि भाडेकरू यांचे काय अधिकार आहेत?

  • मॉडेल टेनन्सी ऍक्ट 2021 नुसार, भाडे कराराच्या दोन प्रती तयार केल्या जातील. मालमत्ता मालक आणि भाडेकरू दोघेही प्रत्येकी एक प्रत ठेवतील. घरमालकाने भरलेल्या भाड्याची पावती घेण्याचा अधिकार भाडेकरूला आहे.

  • घरात काही झीज असेल तर ती दुरुस्त करून देण्याची जबाबदारी भाडेकरूची आहे. भाडेकरूने दुरुस्ती न केल्यास, घरमालक त्याच्या सुरक्षा ठेवीतून दुरुस्ती करून घेऊ शकतो आणि त्याला उर्वरित सुरक्षा ठेव एका महिन्याच्या आत जमा करण्यास सांगू शकतो. जर दुरुस्तीचा खर्च सुरक्षा रकमेपेक्षा जास्त असेल, तर भाडेकरूला सुरक्षा रकमेसह अतिरिक्त रक्कम महिनाभरात जमा करावी लागेल.

  • भाडेकरारात लिहिलेल्या अटी आणि सुविधा भाडेकरूला देणे आवश्यक आहे. जर भाडेकरूला करारनाम्यात लिहिलेल्या सुविधा न मिळाल्यास तो घरमालकाला १५ दिवसांची नोटीस देऊन घर रिकामे करू शकतो.

  • मालमत्तेची किंवा घराची तोडफोड किंवा नुकसान न करण्याची जबाबदारी प्रत्येक भाडेकरूची आहे. त्यानंतरही काही झीज झाल्यास घरमालकाला त्याबाबत लेखी कळवावे लागते.

  • कोणताही घरमालक भाडेकरूच्या घरी कळविल्याशिवाय येऊ शकत नाही. जर घरमालकाला यायचे असेल तर त्याने भाडेकरूला त्याच्या येण्याबाबत किमान २४ तास अगोदर कळवावे लागेल.

  • घरमालक अचानक भाडेकरूला घर रिकामे करण्यास सांगू शकत नाही. त्यासाठी एक महिन्याची नोटीस देणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर घर रिकामे करण्याचे नेमके कारण जाणून घेण्याचा अधिकारही भाडेकरूला आहे. तथापि, जर भाडेकरू काही चुकीचे करत असेल किंवा त्याने सलग दोन महिने भाडे भरले नसेल, तर घरमालक करारनाम्यात लिहिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी घर रिकामे करण्यास सांगू शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT