अमरावतीत कोरोनाचा उद्रेक कायम, लॉकडाउन ८ मार्चपर्यंत वाढवला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा बसलेल्या विदर्भातील अमरावती आणि अकोला या शहरांमधली परिस्थिती अजुनही नियंत्रणात येताना दिसत नाहीये. फेब्रुवारी महिन्यात शहरातील रुग्णसंख्यांमध्ये होणारी वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने अमरावती शहर आणि अचलपूर या भागात लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावतीमधला लॉकडाउन ८ मार्चपर्यंत वाढवला आहे. अमरावती आणि अचलपूरसोबत अंजनगाव सुर्जी हे गावही कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

लॉकडाउन कालावधीत जिल्हा प्रशासनाने याआधी घालून दिलेले निर्बंध पुढेही कायम राहणार आहेत. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. भाजीपाला व दुधाची दुकानं ठराविक वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे. दरम्यान, अकोल्यातही शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन ८ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.

अवश्य वाचा – अकोला, अमरावती, यवतमाळसाठी का महत्त्वाचे आहे पुढचे काही दिवस ?

हे वाचलं का?

अकोल्यात १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत २ हजार ३७५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. २० फेब्रुवारीनंतरही रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून २६ तारखेपर्यंत १ हजार ३२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भातला पॉजिटीव्हीटी रेटही १० टक्क्यांच्या वर पोहचला आहे. त्यामुळे ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अकोला आणि प्रतिबंधीत क्षेत्रात लॉकडाउन वाढवणं गरजेचं असल्याचं मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलं आहे.

लॉकडाउनच्या काळात जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. तसेच या काळात नियमांचा भंग करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT