Saumya sharma ias : कानावर आघात झाला, पण तरीही ‘यूपीएससी’त आल्या टॉपर, सौम्या यांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मंगळवारी झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ म्हणून सौम्या शर्मा यांची नेमणूक झाली. सौम्या शर्मा यांची आयएएस होण्याची कथा खूपच प्रेरणादायी आहे. वयाच्या १६ व्या वर्षी ९० ते ९५ टक्के श्रवणशक्ती गमावल्या नंतरही यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी देशातून नववी श्रेणी मिळवली होती.

ADVERTISEMENT

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो मुलांचे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न असते, परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत जे त्यांचे ध्येय सहज साध्य करू शकतात. खूप कमी लोक या परीक्षेत एकाच वेळी यशस्वी होतात. पण मनात दृढ निश्चय असेल तर कोणतेही काम अवघड नसते. सौम्या शर्मा ऐकू शकत नाही, तरीही त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून हे स्थान मिळवले आहे, हे खुपच प्रेरणादायी आहे.

कोण आहे सौम्या शर्मा?

IAS सौम्या शर्मा दिल्लीच्या रहिवासी आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी सौम्याची ९० ते ९५ टक्के श्रवणशक्ती कमी झाली होती. यानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतले. कायद्याच्या सरावाच्या शेवटच्या वर्षी, त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेला बसण्याचा विचार केला. त्यांनी 2017 साली UPSC परीक्षेत बसून पहिल्याच प्रयत्नात भारतात रँक 9 मिळवला.

हे वाचलं का?

4 महिन्यांची तयारी

श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे सौम्याला लोकांनी अपंग कोट्यातून फॉर्म भरण्याचा सल्ला दिला होता पण तिने आव्हान स्वीकारले आणि त्या सर्वसाधारण श्रेणीत आल्या. त्या सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगल्या होत्या आणि श्रवणशक्ती गमावूनही त्या दहावीत अव्वल आल्या. नागरी सेवेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांना सर्वच विषयात उत्कृष्ट गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फक्त चार महिने अभ्यास करुन UPSC ची परिक्षा पास केली.

16 तासांचा अभ्यास

सौम्याला सुरुवातीपासूनच अभ्यास आणि चालू घडामोडींमध्ये रस होता. वयाच्या ३ ऱ्या वर्षी त्यांनी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली होती. UPSC परीक्षा पास होण्यासाठी त्या दिवसातून 16 तास अभ्यास करायच्या. त्यामुळेच त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि समर्पणाने त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT