महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका, LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
नवी दिल्ली: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. कारण घरगुती वापरच्या सिलेंडर गॅसचे दर (विनाअनुदानित) पुन्हा एकदा वाढवले आहे. आता गॅस सिलेंडरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलेंडरचे दर हे तीनदा वाढवण्यात आले होते. गेल्या महिन्यात सिलेंडर तब्बल 100 रुपयांनी महाग झाला होता. तर आजची दरवाढ पकडल्यास […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. कारण घरगुती वापरच्या सिलेंडर गॅसचे दर (विनाअनुदानित) पुन्हा एकदा वाढवले आहे. आता गॅस सिलेंडरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलेंडरचे दर हे तीनदा वाढवण्यात आले होते. गेल्या महिन्यात सिलेंडर तब्बल 100 रुपयांनी महाग झाला होता. तर आजची दरवाढ पकडल्यास 125 रुपयाने सिलेंडर महागला आहे.
दर महिन्याच्या सुरुवातीला आणि 15 दिवसानंतर एलपीजी सिलेंडर गॅसच्या दरांची समीक्षा केली जाते. त्यानंतर किंमतीबाबत निर्णय घेतला जातो. याआधी 4 फेब्रुवारीला 25 रुपये, त्यानंतर 14 फेब्रुवारीला 50 रुपये आणि नंतर पुन्हा एकदा 25 फेब्रुवारीला 25 रुपयांनी सिलेंडरचे दर वाढवले होते. डिसेंबरपासून आतापर्यंत विनाअनुदानित सिलेंडर तब्बल 225 रुपयांनी महागला आहे.
या दरवाढीमुळे आता 14.2 किलोग्रॅमचा विनाअनुदानित गॅस सिलेंडरची मुंबईतील किंमत 819 रुपये इतकी झाली आहे. 4 फेब्रुवारीला याच सिलेंडरची किंमत 719 रुपये एवढी होती.
पाहा कोणत्या राज्यात विनाअनुदानित सिलेंडरचे किती आहेत दर