शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपूर्वी; किती जणांना दिली जाणार शपथ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील इच्छुकांचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे-फडणवीस […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील इच्छुकांचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी माहिती दिली. ‘सकाळ’ वृत्तपत्राशी बोलताना मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबद्दल भाष्य केलं.
शिंदे-फडणवीस सरकार : मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मुनगंटीवार यांचाही समावेश आहे. शिंदे गट आणि भाजपमधील इच्छुकांना पुढील मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. याबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “19 मंत्र्यांच्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी होईल. २८८ आमदारांच्या १५ टक्के मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ ४३ जणांचं असेल”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
हे वाचलं का?
Narayan Rane: “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार”
खात्यांमध्ये बदल केले जाणार का?; सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खात्यांमध्ये बदल केले जातील अशी चर्चा आहे. या मुद्द्यावर मुनगंटीवार म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून यावेत आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप-युतीची सत्ता यावी, यासाठी कष्ट करावे लागणार आहेत.”
ADVERTISEMENT
“वरिष्ठ नेत्यांना राज्यभर दौरे करून लोकांमध्ये जाता यावे, या उद्देशानं सध्याचं खातेवाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मंत्र्यांना दिलेली खाती पुन्हा बदलली जातील, असं वाटत नाही”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ADVERTISEMENT
‘त्यावेळी गणपतीच नाहीतर सर्व देव आठवत होते’; गुलाबराव पाटील असं का म्हणाले?
शिंदे गट-अपक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार आटोपण्यात आला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा पत्ता कट झाला.
शिंदे गटातील अनेक जण मंत्रिमंडळात संधी मिळणार, यामुळे आनंदात होते. मात्र, ऐनवेळी त्यांना बाहेरच राहावं लागलं. दुसरीकडे शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्षांनाही मंत्रिपदाची आस होती. पण, भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं नाही.
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं आमदार नाराज असल्याची चर्चा सातत्यानं होत आहे. संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासह काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार हा शिंदे-फडणवीसांठी कसरतीचा ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT