मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत होती. अखेर याच प्रकरणी संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद गमावावं लागून असून आज (28 फेब्रुवारी) त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला […]
ADVERTISEMENT

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत होती. अखेर याच प्रकरणी संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद गमावावं लागून असून आज (28 फेब्रुवारी) त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. राज्यपालांनी राजीनाम्यावर अधिकृत मोहोर उमटवल्यानंतर राठोड यांचा राजीनामा ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढील भूमिकेकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, काल (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची वर्षा निवासस्थानावर बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब यांच्यासह महत्वाचे शिवसेना नेते हजर होते. या बैठकीत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाईल असा अंदाज बांधला जात होता. परंतू तिथे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढवला जात होता. शनिवारी भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन राठोड यांच्याविरोधात निदर्शनंही केली होती. अशा परिस्थितीत अधिवेशनात विरोधी पक्षाला वरचढ होऊ न देण्यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला गेला आहे.
ही बातमी पाहा: संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-चित्रा वाघ
‘या’ प्रकरणामुळे संजय राठोडांना गमवावं लागलं मंत्रिपद –