विधानपरिषद निवडणूक: भाजपची सारी भिस्त आयारामांवर, तीन उमेदवार तर मूळचे काँग्रेसी!
मुंबई: विधानसभेला तिकीट कापल्यानंतर आता भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. एकप्रकारे जुन्या कार्यकर्त्याचं पुनर्वसन केलं आहे. पक्षाकडून ओबीसी चेहरा देण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपचे पाचपैकी तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसी विचाराचे आहेत. त्यामुळेच भाजपची सारी भिस्त ही आयारामांवर आहे, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, ही निवडणूक नेमकी का होतेय […]
ADVERTISEMENT
मुंबई: विधानसभेला तिकीट कापल्यानंतर आता भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. एकप्रकारे जुन्या कार्यकर्त्याचं पुनर्वसन केलं आहे. पक्षाकडून ओबीसी चेहरा देण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपचे पाचपैकी तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसी विचाराचे आहेत. त्यामुळेच भाजपची सारी भिस्त ही आयारामांवर आहे, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, ही निवडणूक नेमकी का होतेय आणि भाजपच्या उमेदवार यादीचं वैशिष्ट्य काय? जाणून घेऊयात याबाबत सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. यावेळी 6 जागांवर होणाऱ्या या निवडणुकीसाठी 14 डिसेंबरला मतदान आहे. या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या आहेत.
निवडणूक सहा जागांवर होत असली, तरी भाजपने मात्र पाच जागांवरच उमेदवार दिले आहेत. निवडून येण्याची प्रबळ शक्यता असलेल्या जागांवरच भाजपने नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याचं या यादीवरून दिसतं आहे. मुंबईतल्या दोनपैकी एका जागेवर भाजपने उमेदवार दिला आहे. या यादीमध्ये
हे वाचलं का?
मुंबईतून राजहंस सिंह, कोल्हापुरातून अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल, नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-बुलडाणा वाशिम या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
या यादीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, अमरीश पटेल, अमल महाडिक आणि राजहंस सिंह असे तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसचे आहेत. विधानसभा निवडणुकीआधी ते भाजपमध्ये आले आहेत.
ADVERTISEMENT
-
अमरीश पटेल: अमरीश पटेल हे काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागात त्यांची एकहाती सत्ता आहे. काँग्रेसच्या तिकीटावर ते सलग चारवेळा आमदार राहिले आहेत. शिरपूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ते विधान परिषदेतूनही निवडून आले. भाजपमध्ये सामील झाल्यावर पटेल यांनी राजीनामा दिला. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीतही पटेल यांचा सहज विजय झाला.
ADVERTISEMENT
अमल महाडिक: कोल्हापूरचे अमल महाडिक हेसूद्धा मुळचे काँग्रेसचेच आहेत. त्यांचे वडील महादेवराव महाडिक हे याच जागेवरून अनेकवेळा निवडून आले आहेत. पण गेल्यावेळी विद्यमान मंत्री असलेल्या सतेज पाटील यांनी महाडिक यांचा मोठा पराभव केला होता. यावेळीही पाटील विरुद्ध महाडिक अशीच लढत आहे. फक्त पित्याऐवजी पुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहे.
राजहंस सिंह: तिसरे उमेदवार राजहंस सिंह हे काँग्रेसच्या तिकीटावर अनेक वर्ष नगरसेवक राहिले आहेत. मुंबई महापालिकेत 2004 ते 12 अशी सलग 12 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं आहे. दिंडोशी मतदारसंघातून ते आमदारही राहिले आहेत. 2017 मध्ये विधानसभेच्या तोंडावर ते भाजपमध्ये आले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी भाजपने राजहंस सिंह यांना तिकीट दिल्याचं म्हटलं जात आहे.
MLC Election : विधानसभेवेळी डावललेल्या बावनकुळेंबद्दल भाजपाची भूमिका का बदलली?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईतून मराठी चेहरा असलेल्या चित्रा वाघ यांच्या नावाचीही चर्चा खूप जोरदार चर्चा सुरू होती. पण उमेदवारांच्या यादीत मात्र चित्रा वाघ यांचा पत्ता कट झाल्याचं दिसतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT