दिवाळीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश, ‘कोव्हिड अजून संपलेला नाही…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रय़त्न सुरू आहेत. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

दररोज विक्रमी संख्याने कोव्हिड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे. याआधीही आपण तसे डोस दिले आहेत. आता या मोहिमेला गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिला डोस 100 टक्के नागरिकांना दिला पाहिजे असं उद्दीष्ट ठेवून नियोजन करा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. कोव्हिड अद्याप संपलेला नाही असं नमूद करत त्यांनी लसीकरणाचं आवाहन केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 नोव्हेंबरला कोव्हिड लसीकरणाचा आढावा घेणार आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत पूर्वतयारी बैठक झाली. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे या बैठकीला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी आहे, तसंच जीवालाही कमी धोका आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता नागरिकांनी टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसंच आपल्या आपल्या जिल्ह्यांमध्ये 100 टक्के लसीकरण पूर्ण कऱण्यासाठी प्रयत्न करा असं निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. समाजातील सर्व स्तरातील आणि धर्मातील लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्या अशी सूचना केली.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

ADVERTISEMENT

कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होतं आहे. ही बाब चांगली आहे तरीही नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, निष्काळजीपण करू नये असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसंच कोरोना संसर्ग कमी होत असला तरीही टेस्टिंगचं प्रमाण म्हणजेच चाचण्या कमी होता कामा नये असंही ते म्हणाले आहेत. कोव्हिड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी जनजागृती मोहिम रावबली गेली पाहिजे. चित्रपटगृहं सुरु कऱण्यात आली आहेत, त्यामध्येही लसीकरणाबाबत संदेश दाखवण्यात यावेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT