Malaika Arora तुलना बदकाशी करत नेटकऱ्यांनी तिला का ट्रोल केलं माहित आहे?
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या फॅशन आणि खासगी गोष्टीमुळे चर्चेत असते. अनेक दिवसांपासून मलाइका अरोरा (Malaika Arora) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलाइका आपल्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत आहे. फिटनेस फ्रीक असलेली मलायका याच कारणामुळे ट्रोल झाली आहे. अलीकडे, जेव्हा अभिनेत्री तिच्या योग वर्गासाठी जात होती, तेव्हा पापाराझीने तिचे फोटो आणि […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या फॅशन आणि खासगी गोष्टीमुळे चर्चेत असते. अनेक दिवसांपासून मलाइका अरोरा (Malaika Arora) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलाइका आपल्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत आहे. फिटनेस फ्रीक असलेली मलायका याच कारणामुळे ट्रोल झाली आहे.
अलीकडे, जेव्हा अभिनेत्री तिच्या योग वर्गासाठी जात होती, तेव्हा पापाराझीने तिचे फोटो आणि व्हिडिओ टिपले. मलायका अरोरा कारमधून खाली उतरून योगा क्लासला जात असल्याचे फोटो पापाराझीने काढले. यादरम्यान, असे काही घडले की, मलायका अरोराला जोरदार ट्रोल केले जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मलायका अरोराला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की,’मलायका पोज दाखवण्याच्या नादात बदकासारखी चालत आहे. दुसर्या युझरने म्हटलंय की,’स्टाइल मारता मारता मलाइकाची चाल बदलली. तर तिसरा युझर म्हणतो,’अरे यार… ही कशी चालत आहे? हिची चालच बदलून गेली. मलायकाने Weird walk केला आहे असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ती अशी का चालते आहे कळतच नाही असं म्हणत आणखी एका युझरने कमेंट केली आहे.
ADVERTISEMENT
शाहरुख खान सोबत दिलसे चित्रपटातल्या छैंय्या छैंय्या गाण्यात मलायका झळकली होती. तेव्हापासून ती प्रचंड चर्चेत असते. अरबाझ खान आणि तिच्या डिव्होर्सचीही चांगलीच चर्चा रंगली होती. तसंच अर्जुन कपूरला ती डेट करत असल्याने अर्जुन कपूर आणि मलायकाच्या अफेअरचीही खुमासदार चर्चा बॉलिवूडमध्ये झाली. मलायका अनेकदा जिमला जाताना स्पॉट होते. यावेळी तिची तुलना तिच्या विचित्र चालीमुळे बदकाशी करण्यात येते आहे. तिला यावरून खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT