काँग्रेसला रामराम… राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अभिनेत्री आसावरी जोशी म्हणाल्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी आज (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम मुंबईत पार पडला.

ADVERTISEMENT

आसावरी जोशी हे मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन नव्याने राजकारणाला सुरुवात केली आहे.

खरं तर आसावरी जोशी या मागील तीन वर्षापासून काँग्रेसशी संबंधित होत्या पण आता त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आसावरी जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काय म्हणाल्या आसावरी जोशी?

‘मराठी कलाकारांसाठी झटणारा राष्ट्रवादी काँग्रसे हा एकच पक्ष आहे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेनच. माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आला आहे तो मी पूर्ण करेन. मी असं ठरवून आले आहे की, राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन.’ असं आसावरी जोशी यावेळी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

कोण आहेत आसावरी जोशी?

ADVERTISEMENT

6 मे 1965 रोजी जन्मलेल्या आसावरी जोशी या मराठी चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय आहेत. सिनेविश्वात उत्तम काम केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी मुंबई काँग्रेस तत्कालीन अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्वागत केले होते.

मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम काम केले आहे

आसावरी जोशी यांनी 1986 साली प्रदर्शित झालेल्या ‘माझे घर, माझे संसार’ या मराठी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘धूम-धूम’, ‘मंथन’, ‘डबल सीट’, ‘मुंबई पुणे मुंबई 2’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

आसावरी यांनी छोट्या पडद्यावर देखील अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. 1993 मध्ये प्रसारित झालेल्या ‘जुबान संभालके’ या मालिकेतून त्यांनी टीव्हीच्या दुनियेत पदार्पण केले होते. यानंतर ‘फॅमिली नंबर 1’, ‘मला सासू हवी’, ‘स्वाभिमान’, ‘मुलगी झाली हो’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं होतं.

गायिका वैशाली माडे उतरणार राजकारणात; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

आसावरी जोशी यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा हिट चित्रपट ‘ओम शांती ओम’मध्येही आसावरी जोशीची दमदार भूमिका पाहायला मिळालेली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT