“रंजना’ मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!!
मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. View […]
ADVERTISEMENT

मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती.
त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘रंजना – अनफोल्ड’ या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन – कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.