लाइव्ह

Marathi Live News : सुनील केदार यांची आमदारकी होणार रद्द? जामिनावर मंगळवारी सुनावणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 10:36 PM • 22 Dec 2023

    Marathi Live News : सुनील केदार यांची आमदारकी होणार रद्द? जामिनावर मंगळवारी सुनावणी

    न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर सुनील केदार यांची रवानगी कारागृहाकडे होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर केदार यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेऊन जाण्यात येणार आहे. न्यायालयाला तीन दिवस सुट्टी असल्यामुळे वरच्या कोर्टात मंगळवारी जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, कारण 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने आमदारकी जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • 09:19 PM • 22 Dec 2023

    Marathi Live News : पर्रिकरांचा वारसा प्रमोद सावंत पुढं चालवताता, गडकरींच्या हस्ते गोव्यात पुलाचे उद्घाटन

    मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना दक्षिण आणि उत्तर गोवाला जोडणाऱ्या या झूवारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. आज गोव्यात आल्यानंतर पहिल्यांदाच पर्रिकर यांची आठवण होत असल्याचे मत मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले. डॉ. प्रमोद सावंत हे मनोहर पर्रिकर यांचा वारसा पुढे चालवत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गोव्यात आगामी काळात 10 हजार कोटीचे नवे प्रकल्प प्रस्तावित असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
  • 08:06 PM • 22 Dec 2023

    Marathi Live News: चर्चा करण्याऐवजी गोंधळ घालणे चुकीचे, खासदार निलंबित झाल्याचे आठवलेंनी केले समर्थन

    संसदेत घुसखोरी करणे हे चुकच आहे, मात्र त्याच्यावर चर्चा करण्याऐवजी ज्या खासदारांनी गोंधळ घातला, त्यांना शिक्षा करणे हे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे मत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. खासदारांच्या वर्तनामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगून त्यांनी खासदार निलंबित केले त्या घटनेचे त्यांनी समर्थन केले आहे.
  • 06:26 PM • 22 Dec 2023

    Sunil Kedar : विदर्भातील काँग्रेस नेत्याला पाच वर्षांची शिक्षा

    काँग्रेसचे विदर्भातील महत्वाचे नेते आणि आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात दोषी ठरवली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणात नागपूर न्यायालयाने सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष), केतन शेठ(मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तीन रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी ठरवले होते. सुनील केदार यांना पाच वर्ष शिक्षेसह १२.५० लाख दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास १ वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
  • ADVERTISEMENT

  • 02:25 PM • 22 Dec 2023

    मुंबईची लूट दिल्लीश्वरांच्या आदेशाने -आदित्य ठाकरे

    "मुंबई स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे प्रश्न लोकायुक्तांसमोर मांडू. मुंबई-महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. दिल्लीश्वरांच्या आदेशावर अहमदाबाद असेल, सूरत असेल इथून ही मुंबईची लूट सुरू आहे. ही लूट होऊ देणार नाही, हा निश्चिय आम्ही केला आहे", अशी टीका आदित्य ठाकरेंनी मोदी-शाहांवर केली.
  • 02:13 PM • 22 Dec 2023

    मुंबईतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबद्दल लोकायुक्त घेणार सुनावणी

    "मागच्या दोन आठवड्यांपूर्वी लोकायुक्तांना मी पत्र लिहिलं होतं. मुंबईत २६३ कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे, त्याबद्दल माहिती दिली होती. आजच त्यांचं उत्तर आलेलं आहे की, त्याची सुनावणी फेब्रुवारीमध्ये ठेवली आहे. त्यासाठी त्यांनी मला बोलावलं आहे. मुंबई महापालिका आयुक्तांना बोलावलं आहे आणि नगरविकास विभागाच्या सचिवांना बोलावलेलं आहे. मला अपेक्षा आहे की, मुंबईचे आयुक्त उपस्थित राहतील. कारण आतापर्यंत ते उत्तर द्यायला पुढे येत नाही", अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
  • ADVERTISEMENT

  • 01:31 PM • 22 Dec 2023

    देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जाणार हे पहिलं पाऊल -रोहित पवार

    "मन की बात ऐकणारा निवडणूक आयुक्त बसवण्यासाठी निवड समितीतून थेट सरन्यायाधीशांनाच बाहेर काढणारं बील कोणताही विरोध न होता मंजूर व्हावं, यासाठीच घाऊक पद्धतीने १४४ खासदारांना निलंबित केलं गेलं", अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड समिती विधेयकावर रोहित पवारांनी मांडली.
  • 01:16 PM • 22 Dec 2023

    राहुल गांधींचा जंतरमंतरवरून मोदी सरकारवर हल्ला

    खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षांची सभा दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर पार पडली. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले,"लोकसभेत काही तरुण घुसले. ते उड्या मारत असताना आम्ही पाहिलं. त्यांनी धूर केला. त्यामुळे भाजपचे खासदार सगळे पळून गेले. ती वेगळी गोष्ट आहे की, जे स्वतःला देशभक्त म्हणवून घेतात, त्यांची हवाच निघाली. ते तुम्हाला टिव्हीवर दिसलं नाही, ते आम्हाला दिसलं", असं म्हणत राहुल गांधींनी भाजपच्या खासदारांना लक्ष्य केले.
  • 01:00 PM • 22 Dec 2023

    Marathi News Live Update: मनोज जरांगेंना देवही घाबरतात- छगन भुजबळ

    'आईच्या सासू-सासऱ्यांनाही कुणबी दाखले द्यावे. सासू-सासऱ्यांचे मित्र, व्यावसायिक भागिदारांनाही दाखले द्या. अंतरवालीत मंत्र्यांचे बंगले बांधा, सतत चर्चेला जावं लागतं. जरांगेंना देवही घाबरतात.' असं म्हणत छगन भुजबळांना जोरदार टीकास्त्र सोडलं.
  • 12:32 PM • 22 Dec 2023

    Marathi News Live Update: जरांगेंनी सरकारला नाही तर सरकारनं जरांगेंना वेठीस धरलंय- छगन भुजबळांचा टोला

    'नाराज कुणीही नाही, आम्ही सर्व खूश आहोत. काहींचा आनंद चेहऱ्यावर दिसतो तर काहींचा मनात आहे. जरांगे म्हणतील तसा जीआर काढला पाहिजे. पुढील मेळाव्यात जरांगेंच्या बाजूने भाषण करणार. आरक्षण मिलेपर्यंत पक्षाचं काय, कोणतंच काम करू नये.' असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगेंवर उपरोधिक टीका केली.
  • 12:22 PM • 22 Dec 2023

    Marathi News Live Update: राम मंदिराबाबत संजय राऊत काय म्हणाले?

    'राम मंदिर ही काही कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही. राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. पण, ज्यांनी योगदान दिलं त्यांनाच उद्घाटनाला बोलावणार नाहीत.' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
  • 12:22 PM • 22 Dec 2023

    Marathi News Live Update: काहीही झालं तरी आम्ही आरक्षण घेणार- मनोज जरांगे पाटील

    'काहीही झालं तरी आम्ही आरक्षण घेणार. आम्ही मुंबईत येण्याचं जाहीर केलेलं नाही. पण सरकारलाच वाटतं की आम्ही मुंबईला यावं. आमचं आंदोलन शांततेत होणार.' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
  • 12:22 PM • 22 Dec 2023

    Marathi News Live Update: आरोग्यमंत्री अलर्ट मोडवर, कोरोनासंदर्भात बोलावली बैठक!

    कोरोनासंदर्भात आज दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी ही बैठक बोलावली आहे. सगळे जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य मंत्री अलर्ट मोडवर आहेत.
  • 12:03 PM • 22 Dec 2023

    काँग्रेस आमदार सुनील केदार दोषी

    Sunil kedar News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. कोर्टाने सुनील केदार ( तत्कालीन बँक अध्यक्ष), केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तीन रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी ठरवले आहे. तर इतर तिघांना निर्दोष ठरवले आहे.
  • 11:11 AM • 22 Dec 2023

    पुतण्या सोयरा असतो का? जरांगेंचा सरकारला सवाल

    माध्यमांशी बोलताना शुक्रवारी (२२ डिसेंबर) मनोज जरांगे म्हणाले, "दोन दिवसांत काही केलं नाही, तर पुढची दिशा ठरवणार आहे. आईची जात लावा, याचा अर्थ विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत. तिकडे कुणबी आरक्षण आहे. त्यामुळे तिच्या मुलाला आरक्षणाचा लाभ घेता यावा. तिच्या मुलालाच लाभ घेत येत नसेल, तर केवढी मोठी शोकांतिका आहे. रक्ताचे नाते म्हणजे काय? काल मी हा विषय विचारला", असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
  • 09:40 AM • 22 Dec 2023

    मनोज जरांगेंनी गिरीश महाजनांसमोरच शिंदेंना सुनावलं

    राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी महाजनांसमोरच शिंदे सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) विधानसभेत भाषण केलं, तेव्हा त्यांचा सन्मान केला. फक्त घोषणा मोठी झाली. त्यांनी मोठे घर दिले, दरवाजाही मोठा दिला. पण त्याला कडीकोंयडाच दिला नाही. आधीही घर मोकळे होते, आताही मोकळे आहे. कुणीही या आणि कुणीही जा. तर कडीकोंयडा देणे आवश्यक होते. पाचर नको आहे; आमचे तेवढेच म्हणणे होते की, स्पष्टता करा आणि आहे तेच शब्द मध्ये घ्या."
  • 09:36 AM • 22 Dec 2023

    पुढील ४८ तासांत महाराष्ट्र आणखी गारठणार

    महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत तापमान कमालीचे कमी झाले आहे. हवामान विभागाने थंडींची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासांत तापमानात घट होऊन थंडीचा हा जोर वाढणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याचा हा परिणाम असणार आहे. सध्या उत्तरेकडे थंड वारे सुरु असून, त्याचा प्रवास राज्याचा दिशेने सुरु झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला असून, पुढील काही दिवस हुडहुडी भरणार आहे.
  • 09:33 AM • 22 Dec 2023

    मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या -जरांगे

    गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगेंनी ज्याची कुणबी म्हणून नोंद आढळेल, त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मागणी जरांगेंनी पुन्हा केली. मात्र, हे शक्य नसल्याचे महाजन यांनी सांगितलं. सगेसोयरे या शब्दामुळे पेच अडकला आहे. यातून मार्ग निघेल, अशी आशा गिरीश महाजनांनी व्यक्त केली, मात्र शिंदे सरकार काय तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT