लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या भावाला ईडीचं समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

 • 10:19 PM • 24 Jan 2024

  आमदार रोहित पवारांची 11 तास ईडीकडून चौकशी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

  राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची 11 तास आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बारामती अॅग्रोप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.
 • 09:56 PM • 24 Jan 2024

  खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या भावाला ईडीचं समन्स

  खिचडी घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. संदीप राऊत हे संजय राऊतांचे भाऊ असले तरी ते राजकारणात नाही. आदित्य ठाकरेंचा निकटवर्ती सूरज चव्हाणावर कारवाई झाल्यानंतर आता संदीप राऊत यांच्यावर कारवाई झाल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
 • 09:34 PM • 24 Jan 2024

  काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्येचा भाजपमध्ये प्रवेश

  काँग्रेसचे उपप्रदेश अध्यक्ष व माजी खासदार डॉ .उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. डॉ. केतकी पाटील या रावेर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असून त्याच अनुषंगाने आजचा हा भाजपमध्ये प्रवेश सोहळा झाल्याची चर्चा सुरू आहे.
 • 09:11 PM • 24 Jan 2024

  मुंबईतील गोरेगावमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग

  मुंबईतील गोरेगावमध्ये एका बहुमजली इमारतीला बुधवारी भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाला. या दुर्घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आग लागताच इमारतीतील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.
 • ADVERTISEMENT

 • 09:02 PM • 24 Jan 2024

  नाशिकमधून इसिसच्या संपर्कात असलेल्या एकाला अटक मोबाईल लॅपटॉप हस्तगत

  नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकानं इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. नाशिकच्या मध्यवर्ती भागातील तिडके कॉलनी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या घरातून 7 मोबाईल, लॅपटॉप आणि तीन जुने सिमकार्ड हस्तगत करण्यात आली आहेत. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून पैसे पाठवल्याचा आरोप हुजेफ अब्दुल अजीज शेखवर ठेवण्यात आले आहेत.
 • 06:02 PM • 24 Jan 2024

  मराठा आरक्षणाचा मुद्दा तिघडी सरकारने चुकीच्या पद्धतीने हातळला- विजय वडेट्टीवार

  "मराठा आरक्षणाचा मुद्दा तिघडी सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने चिघळले आहे. वेळ काढू पणा केला. आता दहा दिवसात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतात हे चुकीचं आहे", असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
 • ADVERTISEMENT

 • 05:59 PM • 24 Jan 2024

  रामराज्य आणायचे असेल तर अहंकारी वृत्ती सोडली पाहिजे- विजय वडेट्टीवार

  'राष्ट्रपती मुर्मु यांना आमंत्रित न करण्यामागे यांची अहंकारी वृत्ती दिसून येते. राम समजायचा असेल, रामराज्य आणायचे असेल तर अहंकारी वृत्ती सोडली पाहिजे. जो अहंकार ठासून भरला आहे तो सोडला पाहिजे, आता यांच्याकडून भलतेच वेश परिधान करण्याचे सुरू आहे,' असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
 • 04:45 PM • 24 Jan 2024

  पोलिसांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुणे शहरातील मोर्चाचा मार्ग बदलला

  पोलिसांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुणे शहरातील मोर्चाचा मार्ग बदलला आहे. जहांगीर हॉस्पिटलच्या बाजूने न जाता मोर्चा सादल बाबा चौकातून पुढे मार्गस्थ होणार आहे. सादल बाबा चौक, संगमवाडी संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, विद्यापीठ चौकातून मोर्चा, औंध कडे जाणार आहे.
 • 03:56 PM • 24 Jan 2024

  राम मंदिर दर्शनाबाबत भाजपाचा मेगा प्लॅन

  31 जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार1 फेब्रुवारीला उत्तराखंडचे मुख्यंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार6 फेब्रुवारील अरूणाचल प्रदेशचे मुख्यंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार9 फेब्रुवारीला हरियाणाचे मुख्यंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार12 फेब्रुवारीला राजस्थानचे मुख्यंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार15 फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार22 फेब्रुवारीला आसामचे मुख्यंत्री आणि 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार4 मार्चला मध्य प्रदेशचे मुख्यंत्री आणि मंत्री राम मंदिर दर्शनाला जाणार
 • 03:56 PM • 24 Jan 2024

  बच्चू कडू यांनी ओबीसींच्या अन्नात माती कालवू नये- प्रकाश शेंडगे

  'बच्चू कडू यांना ओबीसी समाजाने पण मतदान केलं आहे. त्यांनी मराठा समजाला ओबीसी समाजात आणण्याचे काम करू नये. बच्चू कडू यांनी ओबीसींच्या अन्नात माती कालवू नये,' अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. तसंच, यापुढे बच्चू कडूंनी ओबीसी मतांची अपेक्षा करू नये असा इशाराही शेंडगेंनी दिला.
 • 02:58 PM • 24 Jan 2024

  सरकारी अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता!

  सरकारी अधिकारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. पुण्यात हा मोर्चा येऊन धडकला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकारी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
 • 02:56 PM • 24 Jan 2024

  Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मार्ग बदलणार?

  मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा सध्या पुणे जिल्ह्यात पोहोचला आहे. आज त्यांचा लोणावळ्या मुक्काम आहे. अशावेळी मोर्चाचा शहरातील मार्ग बद्दलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे पोलिसांकडून जरांगे पाटील यांना मार्ग बदलण्याची विनंती करण्यात आली आहे. जहांगीर हॉस्पिटलकडून न जाता सादर बाबा चौकातून लोणावळ्याकडे मार्गस्थ होण्याची पुणे पोलिसांनी जरांगेंना विनंती केली आहे.
 • 02:18 PM • 24 Jan 2024

  सरकारने शब्द दिला होता...- ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचं मोठं विधान

  'मराठा आरक्षण आंदोलन 26 पासून मुंबईत होत आहे, त्यांनी इशारा दिला आहे. ओबीसीला सरकारने शब्द दिला होता लेखी दिले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही' असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.
 • 01:52 PM • 24 Jan 2024

  मराठा आरक्षाबाबत क्युरेटिव्ह पीटीशनवर होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  मराठा आरक्षणाचा एकीकडे मुद्दा तापत आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत आहेत. असं असताना ही सुप्रीम कोर्टाकडे याचिका लागलेली आहे आणि यावरती आज बंद दाराआड क्युरेटिव्ह पीटीशनवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत प्रामुख्याने तीन मुद्दे होऊ शकतात. पहिला मुद्दा म्हणजे ही याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाचे तीन सिनियर न्यायमूर्ती आहेत ते फेटाळून लावू शकतात. दुसरं मुद्दा, याचिका कर्त्यांना कोर्टाकडून नोटीस इश्यू केली जाऊ शकते आणि तिसरा मुद्दा याचिका कर्त्यांची मागण्यांवर कोर्ट कशाप्रकारे शिक्कामोर्तब करते आणि आरक्षणाचा मुद्दा कसा पुढे जातो हे महत्त्वाचं असणार आहे.
 • 12:49 PM • 24 Jan 2024

  Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांचा आज ताफ्यासह लोणावळ्यात मुक्काम!

  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज लोणावळ्यात मुक्काम असेल. हा पायी मोर्चा खराडीमधून लोणावळ्यात दाखल होणार आहे. ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असल्याचं वक्तव्य जरांगेंनी केलं आहे.
 • 12:46 PM • 24 Jan 2024

  Marathi News Live Update : आम्ही काही चूक केली नाही तर चौकशीच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही- सुप्रिया सुळे

  आम्ही काही चूक केली नाही तर चौकशीच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
 • 12:11 PM • 24 Jan 2024

  रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, संघर्ष यात्रा...

  सत्याचा विजय होईलच, हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे.त्याच्यामुळे आव्हान येत असतील, त्या आव्हानावर मात करायची आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अनेक यंत्रणाचा गैरवापर केला जातोय. संसदेचा एक अहवाल आहे, त्यामध्ये 90 ते 95 केसेस या विरोधी पक्षांवर असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. रोहितला नोटीस येणे काही आश्चर्याची गोष्ट नाही. रोहितने मोठी संघर्ष यात्रा काढली, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
 • 11:42 AM • 24 Jan 2024

  विरोधकांना जाणीवपूर्वक केंद्रीय एजन्सीकडून टार्गेट केलं जातंय - अनिल देशम

  महाराष्ट्रात अडीच-तीन वर्षापासून हेच चाललेल आहे. विरोधकांना ठरवून केंद्रीय एजन्सीचा त्रास द्यायचा आहे, त्यांच्यावर कारवाई करायची आहे. केंद्रीय एजन्सीकडून जाणीवपूर्वक विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा या पद्धतीने सर्व कारवाया सुरू असल्याचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमूख यांनी सांगितले आहे.
 • 10:51 AM • 24 Jan 2024

  रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, शरद पवारांचा घेतला आशीर्वाद

  रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्पुर्वी रोहित पवार यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यानंतर ते ईडीच्या चौकशीसाठी रवाना झाले आहेत. शरद पवार यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक यावेळी भेट दिले. ईडी चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
 • 10:17 AM • 24 Jan 2024

  ईडी चौकशीआधी रोहित पवार काय म्हणाले?

  अधिकाऱ्यांबाबत बोलायचं झालं तर ते त्यांचे काम करतायत. याच्यामागे काय विचार कुठली शक्ती आहे. हे आज तरी मला सांगता येणार नाही. पण युवा संघर्ष यात्रेतून आम्ही ज्या बलाढ्य शक्तीविरोधात उठवला होता, त्यामुळेच ही कारवाई होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. आम्ही ईडी अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिली आहे. आज परत ती माहिती मागविल्याने ती माहिती घेऊन जात असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
 • 08:48 AM • 24 Jan 2024

  मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस

  मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाले. या मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे. हा मोर्चा आता मुंबईपासून अवघ्या काही किलो मीटरवर आहे.
 • 08:44 AM • 24 Jan 2024

  आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी

  आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. दरम्यान, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
 • 08:42 AM • 24 Jan 2024

  मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी 1 वाजण्याच्या सूमारास ही सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती.ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या दालनात बंद दाराआड होणार आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT