लाइव्ह

Rajasthan CM : शेतकरी आणि तरुणांसाठी युवा संघर्ष यात्रेला सहकार्य करा – शरद पवार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:53 PM • 12 Dec 2023

    arathi News Live Update : शिंदेंच्या काळात शिवसेना महाराष्ट्रभर विस्तारली, विजय शिवतारेंची ठाकरेंवर टीका

    उद्धव ठाकरे यांच्या वेळी शिवसेना ही मुंबई पुरतीच मर्यादित होती. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झालं होतं, त्यावेळी शिवसेना ही फक्त मुंबई आणि मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारली आहे. ग्रामीण भागातसुद्धा ताकद दिली जात आहे. असा दावा शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते विजय बापू शिवतारे यांनी केला. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
  • 07:10 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करा, आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी

    माझ्या घरावर मराठा आरक्षणासाठी जो मोर्चा आला, त्यावेळी मला अनेकांनी सल्ला दिला की, तुम्ही घरातून बाहेर पडा. मात्र मला हल्ला आणि बंगाल्याची जाळपोळ होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या हल्लेखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी. विनाकारण जनसामान्य लोकांना पोलिसांनी त्रास देऊ नये अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
  • 06:56 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : ओबीसी आंदोलक अक्षय लांजेवार यांची प्रकृती खालावली

    ओबीसींच्या न्याय्य मागण्यांसाठी 7 डिसेंबरपासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आज 12 डिसेंबर रोजी उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आली आहे. आंदोलकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • 06:41 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : सरकार शेतकरी विरोधी, रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

    युवा संघर्ष यात्रा आठशे किलो मीटरचा प्रवास करून शेतकरी, बेरोजगार, महिला आणि बरोजगारांचे प्रश्न समजून घेऊन ते सरकारकडे मांडायचे होते. मात्र सरकारने आमच्या समस्या जाणून न घेता तहसीलदार आणि शहराध्यक्षांना पाठवून जनसामान्य शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. या कृतीतून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचेच सिद्ध होत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
  • ADVERTISEMENT

  • 06:34 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : गृहमंत्री फडणवीसांकडून पदाचा गैरवापर, युवा संघर्ष यात्रेतील कार्यकर्त्यांचा आरोप

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून युवा संघर्ष यात्रेतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या आणि गरीबांच्या प्रश्नांवर चर्चा करत नसतील तर हे सरकार जनसामान्यांच्या विरोधातील असल्याची टीका युवा संघर्ष यात्रेतून केली आहे. पोलिसांनी रोहित पवार आणि रोहित पाटील यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले.
  • 06:26 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : रोहित पवार, रोहित पाटीलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

    विधानभवनवर धडकणाऱ्या युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडविल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. जनसामान्यांच्या आणि गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्याची मागणी आमची आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, शेतीमालाला भाव देण्यासाठी हे सरकार जर चर्चा करत नसतील तर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो.
  • ADVERTISEMENT

  • 05:56 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : शेतकरी आणि तरुणांसाठी युवा संघर्ष यात्रेला सहकार्य करा - शरद पवार

    देशामध्ये इमान राखणारा शेतकरी आहे, त्याच्यावर संकट आहे. त्या संकटातून सुटका करण्यासाठी युवा संघर्ष यात्रेतून प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. युवा संघर्ष यात्रा ही देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचे मत शरद पवार यांनी मांडले. शेतकऱ्यांसाठी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी अशा यात्रांची गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा या यात्रेतून एक प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे हित, तरुणांचे भवितव्य यासाठीसुद्धा या युवा संघर्ष यात्रेला सहकार्य करा असं आवाहनही शरद पवार यांनी केले.
  • 04:45 PM • 12 Dec 2023

    Rajasthan CM : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!

    राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून वसुंधरा राजे आणि बाबा बालकनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल यांची निवड केली आहे.
  • 02:31 PM • 12 Dec 2023

    गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी घेतलं समाधी दर्शन

    गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी समाधीचे दर्शन घेतले. हातात टाळ घेऊन त्या भजनात दंग झालेल्या दिसल्या.
  • 01:56 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update: महानंद डेअरीतील कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच

    महानंद डेअरीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आज दुसऱ्या दिवशीही गोरेगाव पूर्व परिसरात बेमुदत आंदोलन सुरूच आहे. माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे.
  • 12:26 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : ललित पाटील प्रकरणात 4 बडतर्फ तर सहा पोलिसांचं निलंबन : देवेंद्र फडणवीस

    ड्रग्ज प्रकरणात मोठ्या कारवाया केल्या आहेत. ललित पाटील प्रकरणात 4 पोलीस बडतर्फ तर 6 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ड्रग्ज प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. योग्य ती कारवाई केली नाही तर पुढची पिढी बरबाद होऊ शकते, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले आहेत.
  • 12:06 PM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : नागपूरमधल्या जस्टीस लोया प्रकरणाची चौकशी व्हावी : अंबादास दानवे

    दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आज SIT ची स्थापना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एसआयटीसंदर्भात फोनवरून चर्चा झाली आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर संजय राऊतांवर गुन्हा दाखल होत असेल, दिशा सालियन प्रकरणाची चौकशी होत असेल, तर नागपूर मधल्या जस्टीस लोया प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार असे अंबादास दानवे म्हणाले आहेत .
  • 12:00 PM • 12 Dec 2023

    मनोज जरांगे पाटील बीडमधील मराठा संवाद दौऱ्यानंतर घेणार पुढील उपचार

    मनोज जरांगे पाटील हे थोरात हॉस्पिटलमधून मराठा संवाद दौऱ्यासाठी निघाले आहेत. तब्येत खालावली असली तरी जरांगे पाटील आज सभा घेणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. माहितीनुसार, ते मराठा संवाद दौरा आणि सभा पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील उपचार घेणार आहेत.
  • 10:33 AM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : अमित शाहांवर गुन्हा दाखल करणार का? संजय राऊतांचा सवाल

    'पंतप्रधान मोदींविषयी मनात आदर आहे. त्यांच्यावर जी टीका होते ती राजकीय असते, वैयक्तिक स्वरूपाची नाही. अमित शहांनी नेहरूंवर टीका केली म्हणून गुन्हा दाखल करणार का? राजकीय विरोधकांबाबत खोटा भ्रम निर्माण करण्याचं काम सुरू आहे . सरकार हे विरोधकांवर SIT लावण्यातच व्यस्त आहे. कुणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही, किती वर्ष SIT करणार? 2024 साली सरकार बदलणार.' असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
  • 09:18 AM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : PM मोदींनी पवारांना वाढदिवसाच्या काय दिल्या शुभेच्छा?

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री शरद पवार जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, असे एक्स या सोशल माध्यमावर ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
  • 09:06 AM • 12 Dec 2023

    Marathi News Live Update : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 पर्यंत मुंबई, पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याला येणाऱ्या लेनवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव हद्दीत 2 लेग सर्विसेबल ग्रंट्री बसवण्यात येणार आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT