लाइव्ह

Marathi News Live updates : मुख्यमंत्री पदासाठी भाजपची रणनीती, विनोद तावडेंवर महत्वाची जबाबदारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

 • 10:13 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates :चुकीच्या उपचारामुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, रुग्णालयावर अंत्ययात्रा काढली

  गडचिरोलीमध्ये चामोर्शी मार्गावर डॉ.प्रशांत चलाख आणि डॉ.वैशाली चलाख यांचा मार्कंडेय रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये कविता निलेश कोडाप या 6 रोजी प्रसूतीसाठी मार्कंडेयमध्ये दाखल झाल्या. त्याचदिवशी त्यांची प्रसूतीही झाली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. चुकीच्या औषधोपचारामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेची अंत्ययात्रा थेट रुग्णालयावर काढण्यात आली. यावेळी डॉक्टरांच्या विरोधातत जोरदार नारेबाजी करण्यात आली होती.
 • 09:05 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : ललित पाटीलसह नाशिक पोलिसांनी घेतला तिघांचा ताबा, मोठा खुलासा होणार

  ड्रग्स प्रकरणातील ललित पाटीलसह तिघे जण नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ललित पाटील, झिषान शेख आणि हरिश पंत यांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने घेतला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडत आर्थर रोड कारागृहातून या तिघांचाही पोलिसांनी ताबा घेतला आहे. ललित पाटील नाशिक पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांची नावंही समोर आली होती.
 • 07:06 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : सरकारला दादागिरीने विधेयक आणायचे आहे?, विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

  हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नसताना विधयेक मंजूर कसे गेले असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी केला आहे. यावेळी कॅसिनो संदर्भात बिल आले आहे. तसेच आज ऑनलाईन कॅसिनो, अॅप केंद्र सरकारने सांगितले म्हणून जीएसटीच्या खाली आणले आहे. तसेच राज्याला ऑनलाईन कॅसिनो, जुगार, अॅपच्या माध्यमातून पैसे कमावून लोकांना उद्ध्वस्त करायचे आहे का? असा सवाल विरोधी पक्षाने केला आहे. तसेच या सरकारला दादागिरीने विधेयक आणायचे आहे? असा संतप्त सवाल वडेट्टिवार यांनी केला आहे.
 • 06:12 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : मुख्यमंत्री पदासाठी भाजपची रणनीती, विनोद तावडेंवर महत्वाची जबाबदारी

  लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी पट्ट्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यातील मुख्यमंत्री पदासाठी आता भाजपने निरीक्षकांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सरोज पांडे यांचीही नावं जाहीर करण्यात आली आहे.
 • ADVERTISEMENT

 • 05:38 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : काँग्रेसचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा, 60 ते 70 पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

  महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या 60 ते 70 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवक काँग्रेसने विधिमंडळावर मोर्चा काढून मोर्चाच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण घालण्यात आले. नागपुरातील युवक, विद्यार्थी यांच्यासह नागरिकांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने आज विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा अंजूमन कॉम्प्लेक्समधून विधानभवनावर पोहोचणार होता, मात्र त्याआधीच या मोर्चाला अडविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
 • 05:28 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : पिंपरीमध्ये आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू, फायर कँडल कारखान्यात दुर्घटना

  पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना तीनच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहनं पोहोचली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. मृत झालेले सर्व कामगार हे केकवरीलवरील फायर कँडल बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते.
 • ADVERTISEMENT

 • 05:19 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : पूर्णा शहरात भरदिवसा तरुणाची हत्या, गोळीबार करून तलवार हल्ला

  पूर्णा शहरातील गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय परिसरामध्ये तलवारीने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पिस्तूल आणि बुलेट सापडल्यामुळे युवकावर तलवारीने वार करण्याआधी गोळीबार झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान ही घटना घडली असून, आकाश कदम असं या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. नेमकी हत्या कशामुळे झाली त्या घटने मागे कोण आहे. याविषयी आता तपास सुरू करण्यात आला आहे.
 • 04:40 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

  नांदेड शहरातील वाडी पाटी परिसरात मनोज जरांगे पाटील यांची आज भव्य सभा पार पडली. या सभेत जरांगे पाटील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भाषण करत असताना जरांगे पाटील यांना अचानक अश्रू अनावर झाले होते. माझा लढा हा जातीसाठी आहे. जातीला न्याय मिळावा म्हणून ही लढाई सुरु असल्याचे जरांगे पाटलांनी यावेळी सांगितले. सरकाने आम्हाला वेळ दिली नाही सरकारनेच आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतलेली आहे. काहीही करून सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 • 04:25 PM • 08 Dec 2023

  Pune: आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू

  पिंपरी- चिंचवडमधील तळवडेमध्ये आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची जवान दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. मृत्यू झालेले सर्व कामगार हे केकवरील फायर कँडल बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते.
 • 03:38 PM • 08 Dec 2023

  Mahua Moitra Expulsion Report: महुआ मोईत्रांना मोठा धक्का!

  कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. नीती समितीने या प्रकरणाचा अहवाल लोकसभेत सादर केला होता. त्यांचं निलंबन करण्याची शिफारस समितीने केली होती. हा अहवाल मंजूर होताच मोईत्रांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झालं.
 • 03:26 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : भावी मुख्यमंत्री म्हणून इंदापुरात छगन भुजबळ यांचे बॅनर

  इंदापूरमध्ये उद्या शनिवारी ओबीसी एल्गार मेळावा होणार असून या सभेला ओबीसी समाजाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मार्गदर्शन करण्यात आहेत. या कार्यक्रमाची तयारीही पूर्ण झाली असून इंदापूर तालुक्यात भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ असे बॅनर ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. ओबीसी समाजातील अनेक नेते या एल्गार सभेमध्ये मार्गदर्शन करणारा असून या सभेकडे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमामध्येच छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
 • 02:40 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : अंबाजोगाईत मामाने भाच्याला ठेचून मारले, जागेचा वाद टोकाला

  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य रस्त्यावर 38 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी घडली आहे. राजेंद्र श्रीराम कळसे (वय 37, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजेंद्र आणि त्याचे मामा यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. आज सकाळी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी राजेंद्रला दगडाने आणि लाकडाने मारहाण करण्यात आली होती. त्यातच राजेंद्रचा मृत्यू झाला असून त्याचे मामा फरार झाले आहेत.
 • 02:39 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates: जगातला सर्वात मोठा ढोंगी सोंगाड्या म्हणजे संजय राऊत- नितेश राणे

  'जगातला सर्वात मोठा ढोंगी सोंगाड्या म्हणजे संजय राऊत. आयुष्यभर ढोंगी असलेला दुसऱ्यांना ढोंगी बोलतो हे हास्यास्पद आहे. एक्सप्रेस मध्ये असताना ह्याला नोकरीवरून का काढून टाकल. राऊतचा इतिहास आम्हाला विस्तृत पणे सांगावं लागेल. फडणवीस साहेबांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत म्हणून ते अजितदादांना पत्र दिले आहे.' असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 • 02:18 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : प्रियांक खर्गेंचे सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान, रत्नागिरीत जोडे मारो आंदोलन

  प्रियांक खर्गे यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून रत्नागिरीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. सावरकर यांच्याबद्दल प्रियांक खर्गे यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. उत्तर रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खर्गे यांना पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नावानेही जोरदार घोषणाबाजी करत ठाकरेंचा निषेध व्यक्त करण्यात आला.
 • 01:52 PM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : सोलापूर एपीएमसीमध्ये 837 गाड्या कांद्याची आवक, लिलावच बंद

  कांदा एक्सपोर्ट बंद असल्याने आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 837 गाडी कांदा आल्याने कांदा लिलाव बंद करण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बाजार समिती कार्यालय प्रवेशद्वारात कांदा लिलाव सुरु करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. बाजार लिलाव पूर्ववत सुरु करण्यासाठी व्यापारी केदार उंबरजे आणि पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांची मध्यस्थी केली आहे.
 • 01:36 PM • 08 Dec 2023

  गुणरत्न सदावर्तेना मोठा झटका; एसटी बँकेतील सत्ता धोक्यात

  एसटी बँकेतील गुणरत्न सदावर्ते यांची सत्ता अडचणीत आली आहे. एकाधिकारशाहीला कंटाळून 15 संचालक पाठिंबा काढून घेणार आहेत असा दावा जनसंघाचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.
 • 12:54 PM • 08 Dec 2023

  Maratha Reservation: ...मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही; मनोज जरांगेचा इशारा

  मनोज जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात असून चौथ्या टप्प्यातील पहिली सभा झाली. यावेळी भाषणात जरांगे पाटील म्हणाले की, 'सावध राहा, हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. अधिवेशनात आज काय होणार हे आपण बघूच. सरकारला आव्हान करतो, सर्व मंत्र्यांना पण... कायदा पारित करा. मराठ्यांच्या सर्व आमदार मंत्र्यांनी अधिवेशनात आवाज उठवला नाही, तर मराठा समाज तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही', असं म्हणत जरांगेंनी मराठा आमदारांना इशारा दिला.
 • 12:18 PM • 08 Dec 2023

  Onion Export Stop : कांदा निर्यातीसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

  कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य दर 28 ऑक्टोबर रोजी 800 डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. पण शुक्रवारी (8 डिसेंबर) पुन्हा वाणिज्य विभागाने अधिसूचना काढून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे.
 • 10:54 AM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : फडणवीसांचं पत्र हा ढोंगीपणा- संजय राऊतांची जहरी टीका

  "भाजपाचे वॉशिंग मशीन बिघडलं आहे. सभागृहात बाजूलाच बसता, तरी पत्रव्यवहार कसले करता? मलिकांप्रमाणेच प्रफुल पटेलांवरही आरोप आहेत. तरी मलिकांनाच टार्गेट करणं ढोंग आहे. फडणवीसांचं पत्र हे ढोंगीपणा आहे. सर्व भ्रष्ट लोक तुम्ही घेतलेत मग मलिकांवरच टीका का करता?", असे प्रश्न संजय राऊतांनी केले आहेत.
 • 10:22 AM • 08 Dec 2023

  Marathi News Live updates : राज्यातील ट्रिपल इंजिन बिघडलंय-अंबादास दानवे

  नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले. हे पत्र समोर आल्यानंतर अजित पवारांना खासगीत बोलण्याऐवजी जाहीरपणे विरोध का केला, असेही विरोधकांकडून म्हटले जात आहे. याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात असताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले, 'सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही. सरकारचं ट्रिपल इंजिन बिघडलं आहे.'
follow whatsapp

ADVERTISEMENT