मराठी पाट्या लावण्यास दुकानदारांचाच विरोध, नियम पाळणार नसल्याचं वक्तव्य

विद्या

महाराष्ट्रातली दुकानं आणि आस्थापना यावरचे फलक हे मराठीतच असले पाहिजेत यासंदर्भातल्या कायद्यात राज्य सरकारने सुधारणा केली आहे. दुकानांच्या पाट्या आता मराठीतच असल्या पाहिजेत अशी भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयाला आता दुकानदारांनी विरोध दर्शवला आहे. नव्या नियमाचं पालन करून मराठी पाटी लावणार नाही अशी भूमिकाच काही दुकानदारांनी आता घेतली आहे. मराठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातली दुकानं आणि आस्थापना यावरचे फलक हे मराठीतच असले पाहिजेत यासंदर्भातल्या कायद्यात राज्य सरकारने सुधारणा केली आहे. दुकानांच्या पाट्या आता मराठीतच असल्या पाहिजेत अशी भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयाला आता दुकानदारांनी विरोध दर्शवला आहे. नव्या नियमाचं पालन करून मराठी पाटी लावणार नाही अशी भूमिकाच काही दुकानदारांनी आता घेतली आहे.

मराठी पाट्या लावण्याचा निर्णय झाल्यापासून मनसे आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र लिहून मराठी भाषेत पाट्या करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच हे श्रेय महाराष्ट्र सैनिकांचं आहे असंही त्यांनी म्हटलं. अशात आता दुकानदारांनीच या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

‘दुकानांवरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी सरकारने खर्च द्यावा, मी उभं राहून..’ -इम्तियाज जलील

दुकानदारांचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊन झाल्यापासून आम्हाला नुकसान झालं आहे. लॉकडाऊनमध्ये जे नुकसान झालंय त्यातून आम्ही अजून सावरलेलो नाही. अशात मराठी फलक लावण्याचा खर्च उचलायचा हे आम्हाला परवडणारं नाही. त्यामुळे आम्ही मराठी फलक लावणार नाही असं उघडपणे दुकानदार सांगत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp