इळा पिळा घेऊन जागे मारबत : काय आहे मारबतीचा इतिहास आणि परंपरा…
-योगेश पांडे मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा. यंदाही नागपुरात बडग्या-मारबत महोत्सवाला करण्यात आला आहे. मोठ्या धूम धडाक्यात मिरवणूक काढण्यात येते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नाही. पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. बैल-पोळ्याच्या म्हणजेच मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी […]
ADVERTISEMENT
-योगेश पांडे
ADVERTISEMENT
मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा. यंदाही नागपुरात बडग्या-मारबत महोत्सवाला करण्यात आला आहे. मोठ्या धूम धडाक्यात मिरवणूक काढण्यात येते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नाही. पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.
बैल-पोळ्याच्या म्हणजेच मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणूक शहरातून काढली जाते. या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे (मोठे पुतळे) तयार केले जातात.
हे वाचलं का?
देशात फक्त नागपुर शहरातच हा उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्यावर्षी मारबत मिरवणूक काढली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय आहे मारबतीची परंपरा…?
ADVERTISEMENT
धकाधकीच्या या काळात अनेक परंपरा लोप पावताना दिसत आहे. पण राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने १३७ व १४१ वर्षांपासून चालत आलेल्या ऐतिहासिक वारशाचं जतन केलं आहे. बडग्या-मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली आहे.
ADVERTISEMENT
समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. गेल्या वर्षी आणि यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे मिरवणुकीची परवानगी देण्यात आली नाही. अन्यथा नागपूर शहरातील लाखो नागरिक ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर येत असत.
काळी आणि पिवळ्या मारबतीचं महत्त्व
काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत. महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो.
श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्राचीन काळी मारबत आणि लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.
इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या; ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचं प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत.
वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हावीत आणि चांगल्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या १३७ वर्षा ही परंपरा सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT