Rupert Murdoch: लग्नाची हौस फिटेना.. अब्जाधीश उद्योगपती 92व्या वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rupert Murdoch 5th Wedding: कॅलिफोर्निया: मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक (Rupert Murdoch) यांनी 5 व्यांदा लग्नाची (Wedding) घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी त्यांची जोडीदार अ‍ॅना लेस्ली स्मिथसोबत साखरपुड्याची घोषणा केली आहे. रुपर्ट यांनी लग्नाची घोषणा केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण मर्डोक हे तब्बल 92 वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांची 66 वर्षीय लेस्लीशी भेट झाली होती. (media tycoon and billionaire industrialist rupert murdoch will marry for the fifth time at the age of 92 with ann lesley smith)

ADVERTISEMENT

न्यू यॉर्क पोस्ट या त्यांच्या एका प्रकाशनात त्यांनी म्हटले आहे की, ‘मला प्रेमात पडण्याची भीती वाटत होती. हे माझे शेवटचे प्रेम असेल हे मला माहीत आहे. हे अधिक चांगले होईल. मी आनंदी आहे.’

मर्डोक हे गेल्या वर्षीच त्यांची चौथी पत्नी जेरी हॉलपासून वेगळे झाले आहेत. दुसरीकडे, लेस्ली स्मिथबद्दल त्यांनी सांगितले की, तिला प्रपोज करताना ते बरेच घाबरले होते. लेस्लीच्या पहिला नवऱ्याचं निधन झालं आहे. जो व्यवसायाने गायक आणि रेडिओ टीव्ही एक्झिक्युटिव्ह होता.

हे वाचलं का?

लेस्ली स्मिथ ‘या’ नात्याबद्दल काय म्हणाली?

मर्डोक यांच्यासोबतच्या नात्याबाबत लेस्ली म्हणाली, ‘आम्हा दोघांसाठी ही देवाची देणगी आहे. आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भेटलो होतो. मी गेल्या 14 वर्षांपासून विधवा आहे. माझे पती सुद्धा रुपर्टसारखे व्यापारी होते. त्यामुळे मी त्यांची भाषा बोलू शकतो. आमची विचारसरणीही तशीच आहे.’ मर्डोक यांना त्यांच्या पहिल्या तीन लग्नांमधून सहा मुले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ‘आम्ही दोघेही आमचं उर्वरित आयुष्य एकमेकांसोबत घालवण्यास उत्सुक आहोत.’

मीडिया रिपोर्ट्सनुसार मर्डोक आणि लेस्ली पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत. लग्नानंतर दोघेही कॅलिफोर्निया, मोंटाना, न्यूयॉर्क आणि यूकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्याचा आनंद लुटतील. मर्डोक यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर, स्कॉटिश वंशाची पत्रकार अ‍ॅना मान आणि चिनी वंशाची व्यावसायिक महिला वेंडी डेंग यांच्याशी लग्न केले होते.

ADVERTISEMENT

प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा

ADVERTISEMENT

मर्डोक यांचा शेवटचा विवाह किती काळ टिकला?

  1. मर्डोक यांचा पहिला विवाह 1956 मध्ये पॅट्रिशिया बुकरशी झाला होता, जो 1967 पर्यंत टिकला.

  • दुसरे लग्न 1967 मध्ये अॅना मान यांच्यासोबत झाले आणि ते 1999 पर्यंत टिकले.

  • 1999 मध्ये त्यांनी वेंडी डेंगशी तिसरे लग्न केले आणि 2013 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

  • 2016 मध्ये मॉडेल जेरी हॉलसोबत चौथ्यांदा लग्न केलं. दोघे 2022 मध्ये परस्पर संमतीने वेगळे झाले.

  • Swara-fahad : आधी गुपचुप लग्न नंतर दणक्यात ग्रँड रिसेप्शन, मुख्यमंत्र्यांपासून दिग्गजांची हजेरी

    कोण आहेत रूपर्ट मर्डोक?

    रुपर्ट मर्डोक यांचा जन्म 1931 मध्ये ऑस्ट्रेलियात झाला होता. नंतर ते अमेरिकेत आले आणि आता ते या देशाचे नागरिक आहेत. 1952 मध्ये त्यांना वडिलांकडून वारसाहक्काने ऑस्ट्रेलिया न्यूज लिमिटेड कंपनीची मालकी मिळाली. त्यावेळी त्यांना कंपनीचे एमडी करण्यात आले. 1950-1960 मध्ये त्यांचा मीडिया व्यवसाय झपाट्याने वाढला. आजच्या काळात ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील मोठमोठी वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेलचे मालक आहेत.

    ब्रिटनमधील प्रसिद्ध द टाईम्स, संडे टाइम्स, द सन यासह अनेक वृत्तपत्रे त्यांच्या मालकीची आहेत. याशिवाय ते अमेरिकेचे वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क पोस्ट, 7 न्यूज इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, फॉक्स टीव्ही ग्रुप आणि स्काय इटालियाचे मालक आहेत. 21st Century Fox या मनोरंजन कंपनीचेही ते मालक आहेत. त्यांच्याकडे स्टार स्पोर्ट्स चॅनल आहे. यासोबतच त्यांची नॅशनल जिओग्राफिक आणि ब्रिटिश स्काय ब्रॉडकास्टरमध्ये भागीदारी आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, ते 2000 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत.

    Uttar Pradesh : सजलेला मंडप, बोहल्यावर नवरी.. पण लग्न लागलं दिरासोबत!

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT